अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:44 IST2021-01-08T00:44:27+5:302021-01-08T00:44:34+5:30
पोलादपूरमध्ये वीटभट्टी व्यवसाय धोक्यात

अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आपले रूप दाखवत नुकतीच पेरणी केलेली भुईमुग, चवळी, मिरची, टॉमेटोची रोपे आडवी करून टाकली आहे. तर नुकताच आलेला आंब्याचा मोहोर गळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तसेच वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत सापडला आहेत. काही ठिकाणी घरदुरुस्ती सुरू असल्याने तारांबळ उडाली.
ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तर काही ठिकाणी शेतात पिके आडवी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच कापणी केलेले भात पेंढे भिजून गेले आहेत. एकीकडे कोरोनाशी लढताना पावसाशी सामना करावा लागत आहे, त्यातच आर्थिक मंदी असल्याने विविध साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.
तालुक्यातील तुर्भे लोहारमाळ, वाकण, भोगाव, कोतवाल, ढवली, कामथी, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्यांच्या आंबा पिकाला पावसाचा फटका बसला आहे, तर महामार्गावर काम चालू असल्याने अचानक आलेल्या पावसाने चिखलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जागोजागी खड्डे पडल्याने कंबर मोड प्रवास करावा लागत
आहे.