शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कोट्यवधींचे प्रकल्प रखडले, पाटबंधारे प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:49 IST

श्रीवर्धन तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते.

- संतोष सापतेश्रीवर्धन - तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. तालुक्यातील वडशेत वावे व मारळ या धरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. शासन दरबारी योग्य पद्धतीने कार्यतत्परता दाखवल्यास या धरणाचे पाणी श्रीवर्धन शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली धरणापर्यंत पोहचू शकते, पर्यायाने उन्हाळ्यात निर्माण होणारा पाणीप्रश्न निकाली निघू शकतो.अद्याप वडशेत वावे धरणग्रस्तांमध्ये काही लोकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार शेतकºयांची आहे. वडशेत वावे धरणाला जोडून कालव्याचे खोदाईचे काम पूर्ण झाले आहे, परंतु धरण अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचा उपयोग शून्य आहे.वडशेत वावे पाटबंधारे प्रकल्प अतिशय मोठा आहे. धरणाच्या पाठीमागे असलेल्या भागात नैसर्गिक जलस्रोत आहेत.धरणाच्या बंधाºयांचे काम काही अंशी करण्यात आले आहे.पण आतील भागातील जमीन वनखात्याची असल्याकारणाने ते खोदकाम पूर्ण होऊ शकलले नाही. हा प्रकल्प चांगल्या उंचीवर असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील अनेक भागात कालव्याने पाणी नेणे सहज शक्य आहे. धरणाचे काम पूर्णत्वास गेल्यास वडशेत वावे, साखरी, जावेळे,धारवली, कोलमांडला व गालसुरे ही गावे ओलिताखाली येऊन भातशेती व भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास आजूबाजूच्या परिसरातील विहिरीच्या जलपातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते.दुसरा प्रकल्प हरिहरेश्वरजवळील मारळ गावाच्या हद्दीत सुरू करण्यात आला होता,तो सुद्धा अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकºयांच्या जमीन ताब्यात घेतल्या, परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला.धरण पूर्ण झाल्यास पिण्याचा पाणीप्रश्न निकाली निघेल असा भाबडा आशावाद स्थानिक शेतकरी वर्ग बाळगत होता. मारळजवळच दक्षिण काशी समजले जाणारे हरिहरेश्वर हे प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. तेथे भाविक व पर्यटक यांची सदैव गर्दी असते. ऐन उन्हाळ्यात मात्र हरिहरेश्वरमध्ये पाण्यासाठी त्राही भगवान परिस्थिती निर्माण होते. मारळचा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास बागमांडला, भेंडखोल, कुरवडे, मोहितेवाडी, गडबवाडी, केळेवाडी व हरिहरेश्वर या आजूबाजूच्या अनेक गावांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. राज्याच्या जलसंपदा विभागाने कोट्यवधी रु पयांची उधळण करत या प्रकल्पाचे काम सुरू केले होते, परंतु अद्याप या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडल्याचे भयाण परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे गरजेचे आहे. शेतीस पूरक उपाययोजना करणे आवश्यक आहे. विद्यमान राज्य सरकारने तरी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.माझी पाच एकर जमीन धरण प्रकल्पात गेली.अद्याप धरण झाले नाही, शिवाय मोबदला म्हणून केवळ पंचाहत्तर हजार रु पयेच मिळाले.त्यामुळे प्रचंड नैराश्य आले आहे.- मधुकर सावंत, प्रकल्पग्रस्त शेतकरीअद्याप चालू वर्षात कुठल्याही ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली नाही. गावाने मागणी केल्यास तत्काळ पूर्तता केली जाईल.गेल्या वर्षी चार गावे व नऊ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला होता.- सी. बी. हंबीर, सहा. गटविकास अधिकारी श्रीवर्धन

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड