अत्याचार करणाऱ्या युवकावर गुन्हा
By Admin | Updated: May 13, 2017 01:06 IST2017-05-13T01:06:33+5:302017-05-13T01:06:33+5:30
भाल (अलिबाग) येथील एका युवतीवर नोव्हेंबर व डिसेंबर २०१६ अशा दोन महिन्यांच्या कालावधीत शारीरिक अत्याचार करून तिला

अत्याचार करणाऱ्या युवकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : भाल (अलिबाग) येथील एका युवतीवर नोव्हेंबर व डिसेंबर २०१६ अशा दोन महिन्यांच्या कालावधीत शारीरिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी त्याच गावातील एका युवकाविरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पीडित युवती ही तिच्या काकांच्या घरी राहत आहे. ज्यावेळी आरोपीने शारीरिक अत्याचार केले, त्यावेळी या युवतीने त्यास प्रतिकार केला असता आरोपीने, तुझे जमलेले लग्न मोडेन, अशी धमकी दिली. तिने कोणासही काही सांगू नये म्हणून आरोपीने तिला मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्याचे सपोनि एस.ए. साळे हे पुढील तपास करीत आहेत.