व्यावसायिकावर गुन्हा
By Admin | Updated: September 12, 2015 23:22 IST2015-09-12T23:22:29+5:302015-09-12T23:22:29+5:30
बदलापूर येथील व्यावसायिकाविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डी. एन. यादव यांना बदलापूर येथील नरेश

व्यावसायिकावर गुन्हा
कर्जत : बदलापूर येथील व्यावसायिकाविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डी. एन. यादव यांना बदलापूर येथील नरेश ठक्कर यांनी दिलेले पैसे परत न करण्याची धमकी दिल्याने यादव यांनी तक्रार दाखल केली आहे.
२०११ मध्ये कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डी एन यादव यांच्या मालकीचा कर्जत शहरात मानस कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये व्यावसायिक गाळा आहे. त्यांनी हा गाळा बदलापूर येथील नरेश ठक्कर यांना भाड्याने दिला. त्यावेळी ठक्कर यांनी पशुंच्या औषध विक्रीचा व्यवसाय सुरु केला, त्या व्यवसायात यादव यांनीही काही पैसे दिले होते. परंतु पुढे ठक्कर यांच्याकडे यादव यांनी व्यवसायासाठी दिलेले पैसे परत मागितले असता, त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे यादव यांनी ठक्करला आपले दुकान खाली करण्यास सांगितले. त्यानंतरही ठक्करने यादव यांना त्रास देणे सुरूच ठेवल्याने यादव यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार नरेश ठक्कर याच्यावर फसवणुकचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)