कर्जतमध्ये जमीन मोजणीवरून हाणामारी
By Admin | Updated: January 7, 2016 00:52 IST2016-01-07T00:52:30+5:302016-01-07T00:52:30+5:30
तालुक्यातील दामत येथे मालकीच्या जमीन मोजणीवरून मोठा वाद झाला. या वादात दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात

कर्जतमध्ये जमीन मोजणीवरून हाणामारी
कर्जत : तालुक्यातील दामत येथे मालकीच्या जमीन मोजणीवरून मोठा वाद झाला. या वादात दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळजवळील दामत गावच्या हद्दीत जमीन मोजणी अधिकाऱ्यांनी परवानगी घेतली नाही त्यामुळे मोहमद तकी नजे यांनी जमीन मोजणी संदर्भात आलेल्या अधिकाऱ्यांवर हरकत घेतली. याचा राग येऊन साजिद नजे, सलमान नजे, सुफियन नजे, सलीम नजे, अज्न्नुद्दीन नजे, सेखुमिया नजे, सिराज नजे, जफर नजे, अश्पाक नरवीर यांनी आपसात संगनमत करून मोहमद तकी नजे यांच्या मुलाला लोखंडी सळईने व लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आर. ए.दुसाने करीत आहेत.
दुसऱ्या तक्र ारीत सिराज अब्दुल अजीज नजे यांनी पाच जणांवर बेकायदा गर्दी करून फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सळईने डोक्यात मारून हाताबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे.
मोहमद नजे, असमत नजे, सरफराज टिवाले, साजिद नजे आणि अमजद नजे यांच्यावर तक्र ार नोंद करण्यात आली आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील मोहमद नजे, आरिफ नजे, हुसेन नजे, सलमान नजे हे चौघे जखमी झाले आहेत. (वार्ताहर )