न्यायालयाने निकाल ठेवला स्थगित

By Admin | Updated: November 15, 2016 06:02 IST2016-11-15T06:02:43+5:302016-11-15T06:02:43+5:30

नगर पालिकेतील शेकापच्या नगराध्यक्ष आणि नगरसवेक पदाच्या उमेदवाराविरोधातील सुनावणीवरील निर्णय न्यायालयाने स्थगित ठेवला.

The court adjourned the sentence | न्यायालयाने निकाल ठेवला स्थगित

न्यायालयाने निकाल ठेवला स्थगित

अलिबाग : नगर पालिकेतील शेकापच्या नगराध्यक्ष आणि नगरसवेक पदाच्या उमेदवाराविरोधातील सुनावणीवरील निर्णय न्यायालयाने स्थगित ठेवला. याबाबत मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
शेकापचे प्रशांत नाईक हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर अनिल चोपडा हे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार ठेकेदार असल्याबाबत काँग्रेस आणि भाजपाने आक्षेप घेतला होता. यावर निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव बनसोडे यांनी शेकापच्या बाजूने निर्णय दिला. या विरोधात काँग्रेस आणि भाजपा जिल्हा न्यायालयात गेली होती. न्यायालयामध्ये दोन्ही बाजूकडून काथ्याकूट करण्यात आले. यावर सोमवारी निर्णय अपेक्षित होता मात्र न्यायालयाने तो स्थगित ठेवला. यावर आता मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे दोन्ही उमेदवार चांगलेच लटकले आहेत. न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास दोघांनाही आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The court adjourned the sentence