शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

नगरसेवकांना महासभेची प्रतीक्षा; पाच महिने रखडलेल्या प्रकल्पावर चर्चेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:02 IST

नगरसेवकांच्या आग्रहास्तव ३१ ऑगस्टला पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडणार आहे.

वैभव गायकर  

पनवेल : मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचा लढा पालिका प्रशासन लढत आहे. लॉकडाऊनच्या काळात महानगरपालिकेची एकही महासभा होऊ शकली नसल्याने, सध्याच्या घडीला नगरसेवकांना महासभेची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

विशेष म्हणजे, कोविड व्यतिरिक्त रखडलेले प्रकल्प, नागरिक समस्या आदींवर चर्चेची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. पनवेल महानगरपालिकेतील २० प्रभागांत एकूण ८३ नगरसेवक आहेत, यापैकी ५६ नगरसेवक भाजपचे तर २७ नगरसेवक शेकापचे आहेत. मात्र, निवडक नगरसेवक सोडले, तर इतर नगरसेवक कोविड काळात गायबच होते, असे दिसून आले. पनवेलमध्ये सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक राजू सोनी, नगरसेवक अजय बहिरा, तर खारघरमधून स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेविका लीना गरड, नगरसेविका नेत्रा पाटील, नगरसेवक नीलेश बाविस्कर, प्रभाग अ सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक गुरुनाथ गायकर, तर कळंबोली कामोठेमधून नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेविका हेमलता गोवारी, नगरसेवक डॉ.अरुण भगत हे नगरसेवक या काळात कार्यरत होते.

अनेक नगरसेवक घरात बसून कोविड रुग्णांच्या उपचारासंदर्भात पालिका प्रशासन, तसेच कोविड रुग्णालय प्रशासनाच्या संपर्कात होते. मात्र, कोरोनासोबत जगणे सर्वांना भाग असल्याने, नगरसेवकांनी आयुक्तांकडे महासभेत मागणी केली आहे. अनलॉक सुरू झाल्याने नगरसेवक पुन्हा एकदा कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

नगरसेवकांच्या आग्रहास्तव ३१ ऑगस्टला पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडणार आहे. कोविड काळातील पालिका प्रशासनाचे कामकाज आदींसह कोविड व्यतिरिक्त इतर प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मागील पाच महिन्यांपासून नगरसेवक व पालिका प्रशासनासोबत थेट चर्चा झाली नसल्याने, या महासभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.काही नगरसेवकांनी गाठले होते फार्महाउसकोविड काळात लॉकडाऊन घोषित होताच, काही नगरसेवकांनी थेट आपले फार्महाउस गाठत तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. नगरसेवकाव्यतिरिक्त राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, यावेळी नागरिकांना सहकार्य करताना दिसून आले.

टॅग्स :panvelपनवेल