शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : रायगड जिल्ह्यातील एक हजार शाळांना सुट्टी, ग्रामीण भाग सध्या सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 02:03 IST

कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोनाच्या भीतीने जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे. आतापर्यंत राज्यामध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकाने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल एक हजार १०० शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे शाळांची घंटा पुढील १५ दिवस वाजणार नसल्याने साडेपाच लाख विद्यार्थी सुट्टीवर जाणार आहेत.महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती क्षेत्रातील खासगी व्यस्थापनाच्या सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थ साहाय्यित माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. सरकारने केवळ शहरी भागातील शाळांबाबत हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोनाची दहशत पोहोचली नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक सुरक्षित असल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित होेते.कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे असलेल्या जत्रा, मॉल्स, स्विमिंग पूल, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळांवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही सरकारने केले आहे. पुढील २० दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार १०० शाळा आहेत. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थीसंख्या आहे. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. याच कारणाने सरकारने शाळा, महाविद्यालये ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी आदेश हा शहरी आणि निमशहरी भागांसाठी लागू करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तब्बल दोन हजार ७०० शाळा सुरूच राहणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाखाच्या आसपास आहे. शहरी भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत.कडक कारवाईसाथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ नुसार सरकारने बंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस