शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

coronavirus: कोरोनाबाधितांचा आधार ठरताहेत परिचारिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 01:36 IST

रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल, तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंबदेखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना, मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम सतावत असते.

आविष्कार देसाई रायगड - रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या परिचारिकांचा आजच दिवस आहे. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन त्या रुग्णांची सेवा करत असतात. आज जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट पसरले आहे. निष्पापांना त्याने लक्ष्य करताना लाखो नागरिकांना त्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. त्यामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी जीवाचे रान करून कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबापासून दूर असणाºया कोरोनाबाधित रुग्णांना आधारही त्याच देत आहेत.रुग्णांच्या जवळ २४ तास कोणी असेल, तर त्या परिचारिका आहेत. या परिचारिकांना आपले कुटुंबदेखील आहे. रुग्ण सेवा करून घरी परतत असताना, मी माझ्या सोबत काही घेऊन तर जात नाही ना, ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होईल, अशी भीती कायम सतावत असते. याच कारणासाठी घरी परतत असताना रुग्णालयातील गणवेश तेथेच ठेवून दुसरे कपडे परिधान करून घरची वाट धरावी लागते. दारात पाय ठेवण्याआधीच सॅनिटायझर हातावर घ्यावे लागत आहे. आंघोळ करूनच कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात जावे लागत आहे. त्यांच्या लहान मुलांच्या हे अंगवळणी पडले आहे. त्यामुळे तेसुद्धा थेट आईला जाऊन बिलगत नाहीत.प्रक्षिणामुळे भीती दूरकोरोनाग्रस्त रुग्णाच्या जवळ कसे जायचे, आपल्याला काही झाले तर त्याचा संसर्ग आपल्या कु टुंबातील सदस्यांना होईल अशी भीती मनामध्ये घर करून होती. सरकारने योग्य प्रशिक्षण दिल्याने परिचारिका रुग्णालयातील एक परिवार आणि घरी एक परिवार यांच्यात ताळमेळ घालून काम करत आहेत.कोरोनाच्या दहशतीमुळे रुग्णाजवळ जाताना भीती वाटायची. योग्य प्रशिक्षणामुळे आता भीती नाही. रुग्ण हे आपल्या विश्वासावरच रुग्णालयात भरती झालेले असतात. त्यामुळे त्यांना बरे करून सुखरूप त्यांच्या घरी पाठवणे हेच ध्येय आता उराशी बाळगले आहे. रुग्ण हे आमच्याच परिवारातील एक घटक आहेत.- तेजश्री पाटील-म्हात्रे, जिल्हा रुग्णालयरुग्ण कोणत्या जाती, धर्माचा अथवा पंथाचा आहे., यापेक्षा तो आपल्या विश्वासावर आला आहे. त्यामुळे निश्चितच जबाबदारी वाढते. रुग्णांची काळजी घेताना त्याहून अधिक काळजी आम्हाला आमच्या घरी जाताना घ्यावी लागत आहे. आम्ही आमच्या सोबत काय घेऊन तर जात नाही ना, यासाठी खूपच खबरदारी घ्यावी लागत आहे.- यशोदा नाईक, जिल्हा रुग्णालय

माणूस अंथरुणाला खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशा वेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणत्याची नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपलं म्हणून साथ देते, औषध देते, मानसिक आधारही तीच देते. काही सांगावेसे वाटले तर ऐकणारीदेखील तीच असते. अशा या जीवाभावाच्या ‘सिस्टर’ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम !

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड