CoronaVirus News: रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:31 AM2021-04-10T01:31:12+5:302021-04-10T01:31:25+5:30

जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांची माहिती

CoronaVirus News: Remedivirus, adequate supply of oxygen | CoronaVirus News: रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा

CoronaVirus News: रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा

Next

रायगड :  जिल्ह्यामध्ये तब्बल ४ हजार ३०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे, तर २२ हजार ६५ क्युबिक मीटर ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आराेग्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या दाेन्ही घटकांचा पुरेसा साठा असल्याने चिंता करण्याचे कारण नसल्याचे दिसून येते. दिवसाला सरासरी ७०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.  सरकारी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन ४ हजार ३०० आहेत. पैकी सरकारी रुग्णालयांमध्ये एक हजार ८०० आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दाेन हजार ५०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा समावेश आहे. त्यामुळे उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता पडणार नसल्याचे सध्या दिसून येते.  जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या २४४ रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे, तर ३० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२२ हजार ६५ क्युबिक मीटर ऑक्सिजनचा साठा
ऑक्सिजनच्या बाबतीमध्येही जिल्हा सक्षम आहे. सध्या २२ हजार ६५ क्युबिक मीटर ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी ‘लाेकमत’ला  सांगितले.

Web Title: CoronaVirus News: Remedivirus, adequate supply of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.