शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : जेएनपीटी उभारतेय आणखी एक कोविड सेंटर, राज हिंगोरानी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 07:14 IST

उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे.

उरण : जिल्हाधिकारी आणि बंदरातील काही कामगार संघटनांनी केलेल्या मागणीनंतर जेएनपीटीच्या माध्यमातून कामगार वसाहतीमधील ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी आॅक्सिजनची सुविधा असणारे २४ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. जेएनपीटी कामगार आणि उरणमधील पहिल्या स्टेजमधील कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर उपयोगात आणले जाणार असून, येत्या दोन आठवड्यांत हे सुसज्ज कोविड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.

उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाच्या विळख्यात सध्या गाव, शहर, औद्योगिक क्षेत्रही सापडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असल्याने, रुग्णांची संख्याही कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

वाढत्या रुग्णांमुळे उरण परिसरात असलेली बोकडवीरा येथील १२० आणि ४० बेडची व्यवस्था असलेली दोन्ही कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाली आहेत, तसेच जेएनपीटीने तयार केलेल्या १६ बेडच्या कोविड सेंटरमध्येही आता जागा उरली नाही. त्यामुळे कोविडच्या लोरिस्क आणि हायरिस्कच्या रुग्णांवर उपचार करणे सोडाच, पण पहिल्या टप्प्यातील साध्या रुग्णांवरही दाखल करून उपचार करणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच सोयीसुविधा आणि डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदी स्टाफच्या कमतरतेमुळे तर पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या साध्या रुग्णांनाही पनवेल, एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्याची पाळी उरणच्या आरोग्यसेवेवर येऊन ठेपली आहे. मात्र, पनवेल, नवी मुंबईतील कोविडच्या रुग्णालयात जागा नसल्याने रुग्णांना पुन्हा माघारी पाठविण्यात येते. त्यामुळे कोविड सेंटरमधील सोयीसुविधा आणि डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबाय आदी स्टाफच्या कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारेयांनी दिली.डॉक्टर्स, नर्सेसची व वॉर्डबॉयसह इतर कर्मचाऱ्यांची कमतरता- जेएनपीटी रुग्णालयाच्या दुसºया मजल्यावर २४ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याआधी आॅफिसर क्लबमध्ये १६ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मात्र, तेथील कोविड सेंटर बंद करून नवीन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याचे कामही अलीकडेच सुरू करण्यात आले आहे.- नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचीही व्यवस्था करण्यात येत आहे. येत्या पंधरवड्यात काम पूर्णत्वास जाईल. त्यानंतर, हे कोविड सेंटर उरणकरांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी सीनियर सीएमओडॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.- डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबाय आदी स्टाफच्या कमतरता भेडसावत आहेत. याबाबत जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनाही कळविण्यात आले आहे. तोपर्यंत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवरच कोविड सेंटरचे कामकाज चालविण्यात येणार असल्याची माहितीहीडॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.कोविड रुग्णांसाठी पुढाकार : उरण परिसरातील कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जेएनपीटीने पुढाकार घ्यावा, अशा सूचना रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या होत्या. त्यानंतर, जेएनपीटी बंदरातील कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे सचिव रवींद्र पाटील, अंतर्गत कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश घरत आदी कामगार संघटना आणि आजी-माजी कामगार ट्रस्टींनी केलेल्या मागणीनंतर जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी कोविड सेंटर उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानंतर, बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून १२० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, त्यामधील सुमारे २५ बेडसाठी आॅक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस