CoronaVirus News: कोरोना उपचारासाठी डॉक्टरांना मानधन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:05 IST2020-10-07T00:05:44+5:302020-10-07T00:05:52+5:30
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती; दीड लाख रुपये मिळत असल्याची खोटी माहिती

CoronaVirus News: कोरोना उपचारासाठी डॉक्टरांना मानधन नाही
अलिबाग : वाढीव कोरोनाचे रुग्ण दाखवून डॉक्टर पैसे कमावित असल्याच्या चर्चांना सध्या उधान आले असताना, कोरोना उपचारांबाबत सरकार असे कोणतेही वेगळे मानधन डॉक्टरांना देत नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी स्पष्ट केले आहे, तसेच नागरिकांना उत्तम उपचार कसे देता येतील, याकडे डॉक्टर्स लक्ष केंद्रित करीत असून, रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, नागरिकांची निष्काळजी त्यांच्या अंगलट येऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस रोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. सरकारकडून डॉक्टरांना कोविड १९ रु ग्णांवर उपचार केल्यानंतर दीड लाख रु पये मिळतात. त्यामुळे कोरोना नसतानाही खासगी डॉक्टर कोरोना असल्याचे सांगून उपचार करत आहेत, असा गैरसमज सध्या नागरिकांमध्ये पसरू लागला आहे. कोरोना उपचारांबाबत शासन असे कोणतेही वेगळे मानधन डॉक्टरांना देत नाही. कोरोना चाचणीचा अहवाल हा आयसीएमआरच्या साइटवर असतो. या अहवालाची यादी ही तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे दिली जाते. यादी मोठी असल्याने प्रत्येकाला अहवाल दिला जात नाही, असे डॉ. माने यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
प्रशासनाने जाहीर केलेल्या लॅबमधूनच कोरोना तपासणी करावी. कोरोनाच्या उपचारांसाठी एखादा खासगी डॉक्टर जास्त शुल्क आकारत असेल, तर नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती द्यावी, असे आवाहन डॉ.सुहास माने यांनी केले आहे.