शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus: मुलांना जेवायला मिळेल, मात्र गुरांच्या चारा-पाण्यासाठी मला डिस्चार्ज द्या! काेविड रुग्णांची सुट्टीसाठी कारणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:45 IST

Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला.

- आविष्कार देसाई  रायगड : ''माझ्या मुलांना शेजारचे जेवायला देतील. मात्र, माझ्या गुरा-ढाेरांना चारा काेण देईल, आता मला रुग्णालायतून लवकरच सुट्टी द्या” अशी विनंती रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाने केल्याचे समारे आले आहे. रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी विविध कारणे दिली जात आहेत. त्यामुळे डाॅक्टरही चक्रावून गेले आहेत.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला. रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी काही रुग्ण विविध कारणे सांगून डाॅक्टरांसह नर्स यांचा चांगलाच पिच्छा पुरवच आहेत. रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी देण्यात येणारी कारणे ऐकून डाॅक्टरही चक्रावून गेले आहेत. मात्र,  पूर्ण उपचारानंतरच रुग्णांना सुट्टी दिली जात आहे. डिस्चार्जसाठी काेणती कारणे सांगितली जातात?-  माझा मुलगा खासगी कंपनीमध्ये नाेकरी करताे. माझ्यामुळे त्याला दिवस-रात्र रुग्णालयाबाहेर थांबावे लागत  आहे. मला सुट्टी देत नाही, तोपर्यंत माझा मुलगाही येथून जाणार  नाही, त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे.-  माझा मुलगा लहान आहे,  मला घरी जाणे आवश्यक आहे, माझ्या नवऱ्याला नीट लक्ष देता येणार नाही. घरी खूप आडचण होईल, मला सोडले नाही, तर मी रुग्णालयातून पळून जाईल. - मला बाहेर इतर ठिकाणी झोपच लागत नाही, दुसऱ्या ठिकाणी कधी राहिलेच नाही, नवीन ठिकाणी मला भीती वाटते, मला लवकर डिस्चार्ज करा.- मला सुट्टी दिली नाही, तर मी शेजारच्या बेडवर झोपेन, असा हट्टही एका रुग्णाने धरला. डाॅक्टरांनी त्याचे बाेलणे मनावर घेतले नाही. मात्र, ताे रुग्ण जाणून-बुजून शेजारच्या बेडवर जाऊन झाेपत हाेता. त्यामुळे नाकीनऊ आले हाेते. - माझ्या मुलांना शेजारी जेवायला देतील, त्यांना काय हवे नकाे ते सर्व देतील, परंतु माझ्या गुरा-ढाेरांना चारा-पाणी काेण देईल, मला सुट्टी दिली नाही, तर गुरा-ढाेरांचे हाल हाेतील. सात दिवस उपचार करून नंतर साेडले जाते घरीसध्या जिल्ह्यात काेराेनाचा प्रभाव  कमी हाेत आहे. त्याचप्रमाणे,  रुग्णांना काेराेनाचा संसर्ग हा कमी प्रमाणात असल्याने त्यांच्यावर याेग्य उपचार करून त्यांना किमान सात दिवसांनी सुट्टी देण्यात येत आहे. अगदीच संसर्गाचे प्रमाण अधिक असल्यास त्यांना सुट्टी देण्यास उशीर हाेतो. मात्र, सुट्टी मिळाल्यानतंरही रुग्णांनी वेळेवर औषधे घेऊन  जास्तीतजास्त आराम करायचा  आहे. याबरोबर योग्य आहार  घ्यायचा आहे.रुग्णालयातून सुट्टी मिळावी, यासाठी रुग्णांकडे विविध कारणे तयार असायचीच. त्यामध्ये काही मजेशीर असायची, तर काही रुग्ण समस्या सांगून सुट्टी मागत हाेते. काेराेना हा संसर्ग परसवणारा आजार असल्याने रुग्ण बरा हाेत नाही, ताेपर्यंत त्याला डिस्चार्ज देण्यात आला नाही. - डाॅ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड