शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Coronavirus : कोरोनामुळे किनारे, महामार्ग सुनेसुने, पर्यटकांची संख्या रोडावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 01:57 IST

सध्या जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या भीतीने पर्यटकांनी पाठ फिरवल्याने रेवदंडा-चौलचा किनारा सुनासुना दिसत आहे.

रेवदंडा : कोकणचे निसर्गसौंदर्य हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा ही दोन्ही गावे पर्यटनासाठी प्रसिद्धीत नसली तरी शिमगोत्सवात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र सध्या जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या भीतीने पर्यटकांनी पाठ फिरवल्याने रेवदंडा-चौलचा किनारा सुनासुना दिसत आहे.एरवी सलग सुट्या आल्यावर गजबजून जाणारे किनारे शांत, निर्मनुष्य दिसत आहेत. चौल व रेवदंडा या दोन्ही गावांना स्वतंत्र ओळख आहे. सांस्कृतिक परंपराही आहे. चौलमध्ये नारळ-सुपारीच्या बागा, टेकड्यांवरील पुरातन मंदिरे, आग्राव जेटीवरील ताज्या माशांची खरेदीची मजा तर रेवदंडा म्हटले की पुरातन आगरकोट किल्ला, स्वच्छ व सुरक्षित सुमारे चार किलोमीटरचा किनारा, कोकणातील पदार्थांची खरेदी करण्यासाठी पारनाका हे महत्त्वाचे ठिकाण तर अफनासी निकीतन याचे स्मारक यामुळे एक दिवसीय सहलीसाठी ही ठिकाणे नागरिकांना नेहमीच भुरळ घालतात. मात्र यंदा येथील पर्यटनाला कोरोनाचा फटका बसला आहे.चौलमध्ये परदेशी पर्यटकांचे आवडते असलेले जान्हवी तळे भागातील हॉटेल मालक निनाद रावते यांनी सांगितले की, पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याने कॉटेजमधील कर्मचारी रोजगाराशिवाय बसून आहेत. आॅनलाइन होणारे बुकिंगही गेल्या दहा दिवसांत झालेले नाही.शिमगा उत्सवापासून खरं तर उन्हाळी पर्यटन व्यवसाय सुरू होतो. पण कोरोनाच्या दहशतीने या व्यवसायावर अवकळा पसरली आहे. बहुतांश हॉटेल, रिसॉर्टमधील बुकिंग १५ एप्रिलपर्यंतचे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई-पुणे महामार्ग पडला ओसपनवेल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुण्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने याचाच परिणाम मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिसून आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी पुण्याकडे प्रवास करणे टाळल्याने नेहमीपेक्षा या मार्गावर शनिवारी कमी वर्दळ दिसली. विशेषत: खासगी प्रवासी वाहनेदेखील तोट्यात असून अनेक बसेस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास आले. आठवडा बाजाराला कोरोनाचा फटका1मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मोहोपाडा येथे दर रविवारी भरणाºया आठवडा बाजाराला कोरोनाचा फटका बसला. बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मोहोपाड्यात रविवारच्या बाजारात मुंबई, ठाणे, पुणे येथून व्यापारी येतात. या वेळी रसायनी पाताळगंगा व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात.3कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे मोहोपाडा वासांबे ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवला आहे. शासकीय पातळीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोहोपाडा शहरातील बाजार बंद ठेवण्याचे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाRaigadरायगड