शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

coronavirus: माथेरानचे पर्यटन सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था, रुग्ण वाढल्याने चिंता, स्थानिकांमध्ये द्विधा मनस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 00:49 IST

गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानेच काही मंडळे, संस्था आणि काही पक्षांची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे, यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत.

माथेरान : माथेरानमधील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असते, परंतु कोरोनासारखे संकट कोसळल्याने इथे १८ मार्चपासून पूर्णत: लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनला पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, परंतु आजतागायत जनजीवन सुरळीत होऊ शकलेले नाही.इथले सर्व व्यवहार हे पावसाळ्यात पूर्णत: बंद असायचे. घोडे चार महिने पावसाळ्यात आपापल्या तबेल्यातच आराम करीत असत. तेव्हा घोडेही गुटगुटीत राहत होते, परंतु या कोरोनाच्या लॉकडाऊनमधील कार्यकाळात घोडे एकाच जागेवर तबेल्यात बांधले जात असल्याने आजारी पडत आहेत. गावातील सर्वच नागरिकांना व्यवसायाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानेच काही मंडळे, संस्था आणि काही पक्षांची राजकीय मंडळी माथेरानचे पर्यटन सुरू करावे, यासाठी आग्रही भूमिका घेत आहेत. पाच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पर्यटकांना प्रवेश देण्यात आला, तर आणखीन रुग्ण वाढू शकतात.मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे पर्यटनस्थळ असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनाच आपापले व्यवसाय मनात भीती ठेवूनच करावे लागणार आहेत. त्यातूनही इथल्या सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून इथे पर्यटन सुरू व्हावे, ही भूमिका जरी व्यावसायिकांच्या हिताच्या बाबतीत सकारात्मक आणि योग्य असली, तरीही या लहानशा गावात कोरोना रुग्ण वाढत गेल्यास, त्यासाठी प्रशासनाला खूपच त्रासदायक ठरू शकते. सर्वसामान्य लोकांना पुढील अवाजवी वैद्यकीय खर्च हे न परवडणारे आहेत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच द्विधा मनस्थिती इथल्या स्थानिकांची झाली आहे.आजवर माथेरानमध्ये कोरोना रुग्णांचे शून्य प्रमाण होते, पण गेल्या काही दिवसांत २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हा आकडा पुढे-पुढे वाढत आहेत, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व नागरिक हे नेहमीच काहींना काही कारणास्तव एकमेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी केल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी, नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत सूचना, माहिती देत आहेत.राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे व हॉटेल्स व लॉजेसना सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने, माथेरानचे पर्यटन योग्य ती काळजी घेत सुरू झाले पाहिजे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून खेडेगावापासून मुंबई-पुणे शहरातील व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहेत. कोरोनासोबत जगायचे ठरवल्याने व्यवसायही सुरू करावे लागतील.- सुनील शिंदे,सामाजिक कार्यकर्ते माथेरानमाथेरान पर्यटकांसाठी आता सुरू केले तर कमी प्रमाणात पर्यटक येतील. विविध नियम, संकेत पाळणे सोपे जाईल व या नवीन पद्धतीने वागण्याचा सराव होईल. ज्या गोष्टींची काळजी घ्यायचीय, त्यांची सवय होईल. घोडे, रिक्षा, कुली, स्टॉल्स, हॉटेल इत्यादी व्यवसाय सुरू होतील. सर्वांचे उत्पन्न सुरू होईल, ते आवश्यक आहे.- मनोज खेडकर,माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष माथेरानजिल्हाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार, आजपर्यंत माथेरान लॉकडाऊन आहे. माथेरानमधील नागरिकांना व्यवसाय उपलब्ध व्हावा, यासाठी लवकरच माथेरान पर्यटकांसाठी खुले करावे, याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी वरिष्ठांना ६ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतली, तर पर्यटकांना प्रवेश देण्यास हरकत नाही. १० ते १५ सप्टेंबरमध्ये माथेरान सुरू करण्याचा आमचा मानस आहे.- प्रसाद सावंत, गटनेते माथेरान नगरपरिषद

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMatheranमाथेरानtourismपर्यटन