Coronavirus : महाडमधील सेंटरमध्ये चार जण निगराणीखाली, अफवा न पसरवण्याचे प्रशासनाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:10 AM2020-03-18T02:10:29+5:302020-03-18T02:10:34+5:30

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाइन सेंटर उभे केले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Coronavirus : At the center of Mahad, four people under surveillance | Coronavirus : महाडमधील सेंटरमध्ये चार जण निगराणीखाली, अफवा न पसरवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Coronavirus : महाडमधील सेंटरमध्ये चार जण निगराणीखाली, अफवा न पसरवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next

दासगाव  - एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजले आहे. यामुळे महाडसारख्या ग्रामीण भागातदेखील प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाइन सेंटर उभे केले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र कोरोनाच्या अवास्तव प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफवा पसरवू नका, असे आवाहन प्रशासनाने करून घाबरण्याचे कारण नसल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासन विविध मार्गांनी जनजागृती करत आहे. महाड आरोग्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनो संशयितांसाठी कोरोनटाइन सेंटर उभे करण्यात येत आहे. डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १० खाटांच्या या सेंटरमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांमधील संशयित रुग्णांची तपासणी, प्राथमिक औषधोपचार आणि जेवणासहित राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ मुंबई किंवा पुणे येथे स्थलांतर करण्यात येईल. महाड शहराच्या बाहेर वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे सेंटर सुरू करण्यात होते. मात्र तेथील नागरिकांनी याला विरोध दर्शवल्यामुळे हे सेंटर आता राष्ट्रीय स्मारकात सुरू होत आहे. या कोरोनटाइन सेंटरमध्ये देशात आणि देशाबाहेर फिरण्यास गेलेल्या चार जणांना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास नसला तरी खबरदारी म्हणून पुढील काही दिवस निगराणीखाली ठेवले जाणार आहे, अशी माहिती डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.

शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
नागरिकांनी अफवा न पसरवता खात्री आणि काही शंका असल्यास वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप ८९७५५२२६६७, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आय.यू. बिरादार ९६०४२२१०२४ वर संपर्क साधण्याचे आवाहनदेखील केले.

महाडमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची यादी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सध्या केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तयारी केली जात आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शिवाय अफवादेखील पसरवल्या जाऊ नये.
- डॉ. भास्कर जगताप,
वैद्यकीय अधीक्षक,
महाड

पेणमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज
पेण : पेणमध्ये विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी कोरोना विषाणूचा फैलाव प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयीन अधिकाऱ्यांची तातडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांवर विचार विनिमय व चर्चा करण्यात आली.
जगातील कोरोना विषाणूंचा झपाट्याने झालेला संसर्ग पाहता शासनाकडून आदेश पारीत करण्यात आले आहेत. पेण बाजारात शुकशुकाट आहे. शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून, आठवडा बाजारावर बंदी घातली आहे. याशिवाय जलतरण तलावही बंद ठेवण्याचे आदेश पेण पालिका मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिले आहेत. कोरोना जनजागृतीसाठी पालिकेने होर्डिंग्ज, बॅनर लावले आहेत. दंवडी आदीद्वारे जनजागृती केली जात आहे. प्रशासनाची जनजागृती मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

Web Title: Coronavirus : At the center of Mahad, four people under surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.