शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: बाळा, आता थोडा वेळ तरी हातात अभ्यासाचे पुस्तक घे! पालकांची मुलांना विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 00:29 IST

पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरु झाल्या. या अगोदर नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु झाले होते.

कळंबाेली : पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा, वर्ष संपले तरी सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे लहान मुलांना आता शाळेचा विसर पडला आहे. दिवसभर घरीच खेळणे  नित्याचेच झाले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सोडले तर ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अधुरा राहिला आहे. शहरातही परिस्थिती वेगळी नाही . अभ्यासापासून दूर जाणाऱ्या मुलांना आता थोडा वेळ तरी पुस्तक घे…. म्हणण्याची वेळ  पालकांवर आली आहे. 

पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरु झाल्या. या अगोदर नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु झाले होते. तेव्हा पुन्हा शाळा लहान मुलांनी गजबजणार असे वाटत होते. परंतु तसे काही घडले नाही.  पनवेल तालुक्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या ५५५ शाळा आहेत. तर ७६७४५ विद्यार्थी संख्या आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पनवेल पालिका परिसरातील  पाचवी ते आठवी पर्यंतच्या  सुरु असलेल्या शाळा बंद करण्यात आल्या . खासगी शाळा तर वर्षभरापासून बंदच आहेत. फक्त ऑनलाईन शिक्षण देण्यावर शाळेकडून भर दिला गेला . पाचवी ते आठवी पर्यंत तालुक्यात शाळा आजही सुरु आहेत. परंतु म्हणावी तशी उपस्थिती नसल्याचे चित्र आहे. 

पहिली ते चौथीचे विद्यार्थी खेळण्यात मग्न आहेत. लहान मुले शाळेला विसरली आहेत. मुले  टीव्ही , मोबाईलच्या आहारी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पालक चिंता व्यक्त करत आहेत. संपूर्ण वर्ष वाया गेले असल्याचे मत काही पनवेलमधील काही पालकांनी व्यक्त केले आहे. 

मुले घरी राहून कंटाळली तर आहेतच पण मोबाईल , टीव्हीच्या आहारी जास्त प्रमाणात गेली आहेत. अभ्यास नकोसा झाला आहे. कोरोना मुळे वर्ष तर वाया गेलेच आहे. पण अशी परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस विद्यार्थी नक्कीच शाळेला विसरतील. -नोहर चव्हाण , पालक 

शाळा बंद झाल्यानंतर काही दिवस मुले अभ्यासात रमली , ऑनलाईन शिकवणी सुरु होती आणि आजही सुरु आहे.  पाचवीच्या शाळा सुरु झाल्या पण लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. आता तर लहान मुले अभ्यासासाठी कंटाळा करत आहे. वारंवार पुस्तक घे असे सांगावे लागते. पण त्यात त्यांचे मन रमत नाही.  -शेखर गव्हाळे , पालक

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण