CoronaVirus News: जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचे ट्रिपल सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:43 AM2020-08-12T00:43:22+5:302020-08-12T00:43:28+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या भोवती काचेची भिंत

Corona's triple safety shield at the collector's office | CoronaVirus News: जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचे ट्रिपल सुरक्षा कवच

CoronaVirus News: जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचे ट्रिपल सुरक्षा कवच

Next

- आविष्कार देसाई

रायगड : जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाला सहजपणे घुसता येणार नाही. कोरोनाला रोखताना खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमध्ये कोरोना सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये टेबलाच्या भोवती पारदर्शक काच लावण्यात आल्या आहेत. कार्यालयात येणाºयांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

समाजातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनामार्फत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाळे टाळणे असे अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. आपण घरात राहिलो, तरच कोरोना बाहेर राहील, असे सुरुवातीला सरकारने आवाहन केले होते. मात्र, किती कालावधीसाठी हा नियम लागू करायचा, याबाबत सरकारलाही काहीच माहिती नव्हते. कोरोनावर अद्यापही लस अथवा प्रभावी औषध निर्माण करण्यात जगातील कोणत्याच शास्त्रज्ञांना पूर्ण यश आलेले नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगावे लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. त्याचे अनुकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना केल्या. त्यानुसार, आता समाज कोरोनासोबत जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कोरोनासोबत जगताना दैनंदिन कामकाजामध्ये नकळत कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण बळावले असल्याचे कोरोनाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

काहीच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांची आरोग्य तपासणी केली होती. त्यावेळी तीन कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. संबंधित कर्मचाºयांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला होता, तसेच संपूर्ण इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी आणि या इमारतीमध्ये काम करणारी प्रत्येक कर्मचारी या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. याच कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती कोरोना सुरक्षा कवच उभारण्यात आले असल्याचे दिसून येते.

प्रत्येकासाठी या नियमांचे पालन करणे बंधनकारक
जिल्हाधिकारी कार्यालयाचे एकच गेट आणि एकच दरवाजा प्रवेशासाठी खुला ठेवला आहे. पहिल्याच दरवाजामध्ये कर्तव्यावर असलेले कोरोना योद्धे येणाºयांच्या शरीराचे तापमान तपासतात, तसेच हातावर सॅनिटायझर लावतात. तर पहिल्या माळ्यावर जिल्हाधिकारी यांची अथवा त्यांच्या स्विय सहायकांची भेट घ्यायची असले, राजस्व सभागृहात बैठकीसाठी जायचे असेल, तर तेथेही कोरोना योद्धा तुमच्या शरीराच्या तापमानाची तपासणी करतात, जिल्हाधिकारी यांच्या दालनातील टेबलाच्या भोवती पारदर्शक काच लावण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया प्रत्येकांसाठी या नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.

Web Title: Corona's triple safety shield at the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.