शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
2
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
3
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
4
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
5
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
6
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
7
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
8
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
9
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
10
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
11
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
12
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
13
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
14
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
15
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
16
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
18
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
19
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
20
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती

Corona Virus: माथेरानमध्ये कोरोना रुग्णाची अफवा; चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:03 PM

माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. फक्त पर्यटकांवर अवलंबून असलेले माथेरान हे एकमेव पर्यटनस्थळ आहे.

माथेरान : माथेरानमध्ये पर्यटनास आलेल्या एका विदेशी पर्यटकास कोरोनाची लागण झाल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवल्याने माथेरानमध्ये खळबळ माजली होती. पण अधिक चौकशी केल्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले असून तसे नगरपालिकेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. फक्त पर्यटकांवर अवलंबून असलेले माथेरान हे एकमेव पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथील प्रत्येक बातमीचा प्रभाव पर्यटनावर होतो. गुरुवारी माथेरानमध्ये आलेल्या एका पर्यटक महिलेला कोरोनाची लागण झाल्याची बातमी पसरली. ही महिला चाळीस दिवसांच्या भारत भेटीवर असून माथेरानमध्ये मागील काही दिवसांपासून राहत आहे. या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गेली असता तिला सर्दी व घसा दुखत असल्याचा त्रास जाणवल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. मात्र ती पूर्ण बरी झाली आहे. या प्रकरणी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे माथेरानचे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आकाश चौधरी यांनी सांगितले.माथेरानमध्ये कोरोनाचा कोणताही रुग्ण आढळला नसून खोट्या माहितीच्या आधारे ज्यांनी वृत्त पसरवले त्यांना पालिकेमार्फत समज देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. - प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरानसदर पर्यटक महिला माथेरान येथील रुग्णालयात सर्दीवर उपचार घेण्यास आली होती. तिच्यावर उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. - उदय तांबे, वैद्यकीय अधिकारी, माथेरान

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस