शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी मिळणार १४ हजार काेविशिल्डचे डाेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 00:45 IST

Corona Vaccine : रायगड जिल्ह्यासाठी काेविशिल्डची एक लाख ३४ हजार २०० तर १५ हजार ८२० काेव्हॅक्सिन अशी एकूण १ लाख ५० हजार २० लस प्राप्त झाली हाेती.

रायगड : जिल्ह्यासाठी नव्याने १४ हजार काेविशिल्डचे डाेस पुण्यावरून रवाना झाले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत सदरचे डाेस उपलब्ध हाेणार आहेत. १४ हजार डाेसपैकी पनवेल महानगर पालिकेसाठी ७ हजार डाेस मिळणार आहेत. उरलेले ७ हजार डाेस रायगड जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे लसीकरणाला पुन्हा सुरुवात हाेणार असल्याचे चित्र आहे.रायगड जिल्ह्यासाठी काेविशिल्डची एक लाख ३४ हजार २०० तर १५ हजार ८२० काेव्हॅक्सिन अशी एकूण १ लाख ५० हजार २० लस प्राप्त झाली हाेती. आतापर्यंत ३६ हजार ६३ आराेग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लस टाेचण्यात आली आहे. ४५ वर्षावरील ३२ हजार १८१, ज्येष्ठ नागरिक ६० हजार ३६७ लाभार्थ्यांना लस टाेचण्यात आली आहे. दुसरा डाेस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १४ हजार ७१३ आहे. त्यानुसार १ लाख ४३ हजार ३२४ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सदरची आकडेवारी ९ एप्रिलपर्यंतची आहे. काही ठिकाणचा लसींचा साठा संपल्याने सध्या ८४ पैकी ४८ लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. लसीकरणासाठी नागरिक विविध लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. लसींचा साठा संपल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.जिल्ह्यातील लसीकरण सुरू राहावे यासाठी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी थेट पुण्याचा मुख्य कार्यालयाकडून १४ हजार लसींची मागणी केली. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत त्या उपलब्ध हाेणार आहेत, असे जिल्हा काेविड लसीकरणाचे समन्वयक डाॅ. गजानन गुंजकर यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. लस प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील १४ हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ हाेणार आहे. १४ हजार लसींपैकी ७ हजार लसींचा पुरवठा पनवेल महानगरपालिकेला करण्यात येणार आहे, तर उर्वरित लस ही रायगड जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. त्यानुसार किमान ५० केंद्रांवर सरासरी १४० लसी प्राप्त हाेणार असल्याचे बाेलले जाते. त्यामुळे पुन्हा दाेन दिवसांमध्ये लस संपून गाेंधळ उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड