शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 20:17 IST

Dr. Appasaheb Dharmadhikari takes dose of COVID-19 vaccine : अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सुचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

ठळक मुद्देसरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले.

रायगड : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बुधवारी कोरोनाची लस घेतली. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना सायंकाळी पाच वाजता लस टोचण्यात आली. कोरोनाची लस सुरक्षित आहे. अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सुचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. लस घेतल्यानंतरही नाका-तोंडाला मास्क लावा, सातत्याने हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे भान ठेवा. सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले. (Dr. Appasaheb Dharmadhikari takes dose of COVID-19 vaccine)

सर्वत्रच कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींची भारतात निर्मिती करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सर्वत्र सुरु आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी लस घेतली. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्स आश्विनी नाईक यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लस टोचली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव उमेशदादा धर्माधिकारी यांनी देखील लस घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे, डॉ. जुईली म्हात्रे, नर्स निशा कावजी यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस