Corona Vaccination: लसीकरणासाठी प्रौढांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:27 AM2021-04-10T01:27:19+5:302021-04-10T01:27:35+5:30

आठ दिवसांत १० हजारांपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद

Corona Vaccination: Elderly people are more enthusiastic about vaccination than adults | Corona Vaccination: लसीकरणासाठी प्रौढांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त

Corona Vaccination: लसीकरणासाठी प्रौढांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा चैथ्या टप्पा उलटला आहे. त्यात गेल्या आठ दिवसांत सुमारे १० हजारांपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यात ४५ वर्षांवरील २३ हजार ९५७ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, तर ३५ हजार ६७० हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण झाले. यामध्येही ज्येष्ठच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरणासाठी जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. पहिला टप्पा संथगतीने झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात लसीकरणाला गती आली आहे. एका दिवसाला सरासरी आता ४ हजारांवर लसीकरण होत आहे. दरम्यान, सर्वच केंद्रांवर ज्येष्ठांची संख्या अधिक दिसली.

जिल्ह्यात एकूण ८४ लसीकरण केंद्र असून, त्यापैकी ५९ लसीकरण केंद्र सुरु आहेत, तर २५ केंद्र लसीच्या कमतरतेमुळे बंद आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार १०९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर ३ हजार ७८० डोस शिल्लक आहेत.

जिल्ह्यात लसीकरणाचा चौथा टप्पा गतीने सुरू आहे. केंद्रात योग्य प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. अजून लागणाऱ्या कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त होणार आहेत. महिनाभरात चौथा टप्पा पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे. सर्वच केंद्रांवर आता प्रतिसाद चांगला मिळत आहे.
- डाॅ. सुहास माने. 
(जिल्हा शल्य चिकीत्सक)

ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद 
शहरांपेक्षा ग्रामीण भागात लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८ एप्रिलपर्यंत २५९३५ इतक्या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला, तर शहरी भागात हेच प्रमाण कमी असल्याचे चित्र दिसतेे.
ग्रामीण भागामध्ये कोविशिल्ड लसीकरणाबाबत जनजागृती झाली असून, नागरिक आता स्वतःहून लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

Web Title: Corona Vaccination: Elderly people are more enthusiastic about vaccination than adults

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.