शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:59 IST

रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे.

उरण -  रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे किनारी परिसरात आढळणाऱ्या माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना मत्स्य दुष्काळाची चिंता भेडसावत आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये करंजा, मोरा हा परिसर पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र काही मंडळींनी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ धरून मासेमारी व्यवसायात वृद्धी केली आहे. यासाठी उरण दिघोडे गावात मत्स्यप्रक्रि येबाबत सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाहून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील इतर राज्यांतही निर्यात केली जाते; परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अडचणी उद्भवू लागल्या आहेत. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर संकट ओढावले आहे. किनाºयालगत तसेच खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे.‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ फिशरीज एज्युकेशन’ या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील १२५ माशांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त ७८ जाती शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षात पर्ससीन जाळ्यांचा वापर तसेच एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यात वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असली तरी सागरी प्रदूषणही वाढले आहे.पनवेल कोळीवाडा हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळबाधित झाले. तर माजगाव, मुरु ड, नांदगाव, राजापुरी दिघी, तुरूंबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोरली ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीटीबाधित गव्हाण हनुमान कोळीवाडा, पाणजे गाव, कारंजा इन्फ्रा प्रोजेक्टमुळे बाधित करंजा गाव व सात पाडे या समुद्रकिनाºयावरील खाडीलगतच्या परिसर प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी मच्छीमारांवर उपासमारीचे सावट पसरले आहे.खारफुटीची कत्तल संवर्धनात अडचणीडिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरु स्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, नवे प्रकल्प व येणाºया कोस्टल रोडमुळे खारफुटीची बेसुमार कत्तल होत असल्याने मत्स्य संवर्धनात अडचणी येत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार