कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By Admin | Updated: October 14, 2016 06:39 IST2016-10-14T06:39:40+5:302016-10-14T06:39:40+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियान २०१७ मध्ये पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यावर

Contract workers' agitation | कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अलिबाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान २०१७ मध्ये पूर्णत: बंद होणार आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यावर बेकारीची कु ऱ्हाड कोसळणार आहे. केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणाविरोधात रायगड जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी गुरु वारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. काम बंद आंदोलनामुळे कामानिमित्त येणाऱ्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागला.
राज्यातही सर्व जिल्ह्यात हे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामुळे रायगडसह राज्यात आरोग्याचे चांगले काम झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना २०१७ नंतर कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. त्याचा फटका रायगडसह राज्यातील सुमारे ६० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसणार आहे. याआधीही आपल्या मागण्यांसंदर्भात पहिल्या टप्प्यात २४ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत काळ्या फिती लावून काम केले होते. दुसऱ्या टप्प्यात २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र तरीही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्या विरोधात १३ आॅक्टोबर रोजी एक दिवसाचे कामबंद आणि धरणे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विकास धुमाळ यांनी सांगितले.
निवडणुकीच्या आधी भाजपाचे सरकार आल्यावर तुम्हाला रस्त्यावर बसू दिले जाणार नाही, असे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले होते. मात्र सरकारची दोन वर्षे उलटून गेली तशी आश्वासनेही विरून गेली. निवडणुकीसाठी आमचा फायदा घेऊन आमचे प्रश्न मात्र अधांतरीच ठेवले आहेत. योजना २०१७ ला पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तुमच्या संबंधीचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यावयाचा आहे, असे स्पष्ट केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगितले असल्याचे संघटनेने सांगितले. धरणे आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही तर २६ आॅक्टोबरला मुंबई येथे मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच डिसेंबर महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. रायगड जिल्हा परिषदेसमोर बसलेल्या या आंदोलकांना अलिबाग मुरु ड विधानसभेचे आ. पंडित पाटील व जिल्हा परिषद बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी भेट दिली. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Contract workers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.