शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

माले शाळेच्या आवारात बांधकाम साहित्य

By admin | Updated: April 19, 2017 00:45 IST

कर्जत तालुक्यातील माले येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य

नेरळ : कर्जत तालुक्यातील माले येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि महावितरणने विजेचे खांब ठेवले आहे. त्यामुळे याचा त्रास शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडे या शाळेच्या आवारात असलेले साहित्य हटविण्यासाठी पत्रव्यवहार देखील केला आहे, परंतु ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.सलोख ग्रामपंचायत हद्दीत माले येथे रायगड जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेच्या समोरून कळंब-पाषाणे रस्ता जात आहे. या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावर टाकण्यासाठी आणलेल्या मोऱ्या (पाइप) शाळेच्या आवारात टाकण्यात आल्या आहेत. रस्ता रखडल्याने दोन वर्षांपासून या मोऱ्या (पाइप) तशाच पडून आहेत व त्याच्याच बाजूला महावितरणचे सिमेंटचे पोल टाकण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना इजा होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. विद्यार्थ्यांचे डोके फुटणे, पायास दुखापत होणे, अशा गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असल्याने या वस्तू हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.हे साहित्य ठेवताना शाळेची कोणतीही परवानगी बांधकाम विभागाच्या आणि महावितरणच्या ठेकेदार वा अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. तरीही दोन वर्षे होऊनही हे साहित्य हटविले नाही. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही याची दखल ना सरपंचांनी ना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने ना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे हे साहित्य तसेच शाळेच्या आवारात पडून आहे. तेव्हा हे साहित्य लवकरात लवकर उचलण्यात यावे, अशी मागणी येथील विद्यार्थी, शिक्षकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)