पाणी व स्वच्छतेची आढावा बैठक संपन्न

By Admin | Updated: May 8, 2016 02:48 IST2016-05-08T02:48:30+5:302016-05-08T02:48:30+5:30

महिलांच्या आत्मसन्मानासाठी जिल्ह्यातील स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम

Complete review meeting of water and sanitation | पाणी व स्वच्छतेची आढावा बैठक संपन्न

पाणी व स्वच्छतेची आढावा बैठक संपन्न

अलिबाग : महिलांच्या आत्मसन्मानासाठी जिल्ह्यातील स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले. मुरुड तालुक्यातील दरबार सभागृहात सरपंच आणि ग्रामसेवकांची आढावा बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत गायकवाड बोलत होते.
मुरुडच्या गटविकास अधिकारी मीना रानवडे यांनी अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. ज्या ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करायच्या आहेत तेथील सरपंच, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांना मार्गदशन केले. हागणदारीमुक्त गावचे निकष आणि पूर्ततेसाठी करायच्या उपक्रमांची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे संवादतज्ज्ञ सुरेश पाटील यांनी दिली.
मुरुड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमधील १३ हजार १७४ कुटुंबांची संख्या आहे. चार हजार ५९९ शौचालये बांधण्याचे अद्याप बाकी आहे. मुरुड तालुक्यात ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित उद्दिष्ट या वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याने सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Complete review meeting of water and sanitation