शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:21 PM

महापालिका आयुक्तांना निर्देश : रुग्णालयांबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी करीत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल रायगड जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रकाची पायमल्ली करून खासगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक लूटमार सुरू असल्याने लेखा परीक्षण समितीच्या अहवालाप्रमाणे त्या हॉस्पिटलवर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहेत.

खासगी रुग्णालये सरकारचे नियम मोडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याची बाब ‘लोकमत’ने २२ सप्टेंबर रोजीच्या अंकात ‘लेखापरीक्षण समितीचे काम कागदावरच’ या मथळ्याखाली उघडकीस आणली होती. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली आहे. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारदेखील केली होती. त्यासंदर्भात चौधरी यांनी देशमुख यांना लेखी पत्राद्वारे आदेश देऊन सरकारी परिपत्रकानुसार बिल आकारणी न करणाºया खासगी रुग्णालयांविरोधात कारवाई करून अहवाल द्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य रुग्णांसह अन्य रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याने संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी समाधान व्यक्त केले.

पालिका आयुक्त देशमुख यांनी नियुक्त केलेली लेखापरीक्षण समिती कागदावरच असल्याने त्यांचे रुग्णालयासोबत साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला होता.

खासगी रुग्णालयांनी सरकारने घोषित केलेल्या २१ मे २०२० च्या परिपत्रकानुसारच बिलाची आकारणी करावी. इतर खर्चाचा त्यात समावेश केल्यास रुग्णांची ती लूट ठरेल. यासाठी सरकारी अध्यादेशानुसार कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेशात स्पष्ट केले आहे.दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील माहिती द्यासुरुवातीला २२ जुलै रोजी मेट्रो सेंटर क्रमांक ३ च्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीपा भोसले यांची लेखापरीक्षण समितीवर नियुक्ती केली होती. त्यांनी राजीनामा दिल्यावर त्यानंतर २ सप्टेंबरपासून मेट्रो सेंटर २ चे उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांची नियुक्ती झाली होती. दोन्ही अधिकाºयांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रात नमूद केले आहे.