शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या लाटेने रायगड जिल्हा गारठला, गरम कपडे घेण्यासाठी लगबग, जागोजागी शेकोट्या पेटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:27 IST

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे.

अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अचानक हवामानात बदल होऊन वातावरणात कमालीचा गारवा आला आहे. सकाळी आणि रात्री बोचणारी थंडी आता दुपारीदेखील कापरे भरवत असल्याने थंडीपासून संरक्षण करण्याठी गरम कपडे घालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्याचप्रमाणे थंडीपासून दिलासा मिळावा, यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीची मज्जा लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकही दाखल झाले आहेत.राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट आल्याने त्याचा तडाखा रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, माथेरान-कर्जत, महाड, पोलादपूर, रोहे, श्रीवर्धन, म्हसळा, तळा यांच्यासह अन्य तालुक्यांनाही बसला आहे. सकाळी थंडी अधिक असल्याने धुक्याने शहर आणि गावे चांगलीच नाहून निघत आहेत. आल्हाददायक थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकदेखील दाखल झाले आहेत. नागरिकांनी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे बाहेर काढले आहेत. ग्रामीण भागामध्ये शेकोटी पेटवून त्याचा आनंद घेण्याचे चित्र आपण सातत्याने पाहतो. यंदा मात्र शहराच्या काही भागांमध्येही शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे दिसत आहे.वाफळणाऱ्या चहाचे झुरके मारत नाक्यानाक्यांवर रंगतदार गप्पांनाही चांगलेच उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार थंडीचा कडाका असाच काही दिवस राहणार असल्याने आणखी काही दिवस तरी थंडीची चांगलीच मज्जा लुटता येणार आहे.तालुक्यात बोचरी थंडीरोहा : रोहा तालुक्यासह उर्वरित जिल्ह्यात गेले काही दिवस तापमान कमालीचे घसरले आहे. गेल्या दोन दिवसांत तर तापमान १७ अंशांपर्यंत व त्याहून खाली आल्याने बोचऱ्या थंडीचा कडाका सर्वत्र पडला असून, संपूर्ण जिल्हा गारठला आहे.वाढीस लागलेल्या या थंडीचा सामना करताना सर्वांचीच तारांबळ उडत आहे. स्वेटर, मफलर, कानटोप्या आदी गोष्टींची अचानक गरज भासू लागली असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू आहे.भल्या पहाटे औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीसाठी जाणाºया कामगारवर्गाची कडाक्याच्या थंडीत त्रेधातिरपिट उडत आहे. थंडीमुळे खोकला, सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंडीचा हा कडाका आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.मुरुड, आगरदांडा परिसरात थंडीची लाटआगरदांडा : आगरदांडा परिसरात थंडीची प्रचंड लाट सुरू आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून गार वारे सुरू झाल्याने अंगात स्वेटर व कानटोपी घालावी लागत आहे. सध्या वालाची शेतीचा हंगाम सुरूझाल्याने गारवा अधिक प्रमाणात जाणवत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने लोक उशिरा कामावर जात असल्याचे चित्र दिसत आहे.उबदार कपडे घेण्यासाठी मुरुड बाजारपेठेत लगबग आहे. कोकणातील पर्यटनस्थळ आणि समुद्रकिनाºयावर पर्यटकांची गर्दी आहे. वातावरणात गारवा आणि रम्य उबदारपणा आल्याने पर्यटक खूप खूश आहेत. पर्यटनप्रेमी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवरून मोठ्या संख्येने येताना दिसून येत आहे.मुरुडमध्ये सध्या मस्त गुलाबी थंडीचा मोसम असून तापमानाचा पारा १५.५ से. इतका खाली घसरल्यामुळे सर्वच ठिकाणी धुक्याची चादर पाहावयास मिळाली. कोकण म्हणजे हिरवीगार वनश्री, डोंगर-दºया जंगलभागातून जाणारे नागमोडी रस्ते, सकाळच्या प्रहरी दिसणारी धुक्याची चादर, प्रेमळ माणसे असे चित्र नेहमीच दिसत असते.बाजारातील व्यवहार मंदावलेरेवदंडा : गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील व्यवहार सकाळी १० नंतरच सुरू होताना दिसत आहेत. सायंकाळी ७.३० लाच बाजारपेठेत शुकशुकाट जाणवू लागला आहे. थंडीने स्थानिक नागरिक सकाळी घराबाहेर उशिरा पडताना दिसत आहेत.पहाटे मोकळ्या हवेत फिरायला जाणाºयांची संख्या घटली आहे. थंडीने मात्र स्थानिक फुलांचा भाव वधारलेला दिसत आहे. कापड दुकानांमध्ये ऊबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक दिसत आहेत.थंडीचा जोर वाढत चालल्याने आंबा, काजू बागायतदार सुखावले आहेत.म्हसळा गारठले; स्वेटर, ब्लँकेटची मागणी वाढली, आंबा बागायतींना फटकाम्हसळा : म्हसळा तालुक्यात गेले १- २ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येते. डिसेंबर महिन्यापासून थंडीचा जोर हळूहळू वाढत आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर थोडा कमी झाला होता. गेले दोन - चार दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. पहाटेच्या वेळी काही प्रमाणात धुके पडत आहे. याचा भाजीपाला आणि आंबा बागायतींना फटका बसण्याचा धोका आहे, असा दावा काही बागायतदारांनी केला. तर या कडाक्याचा थंडीमुळे पिकांवरील रोगराई कमी होईल, असाही दावा बागायतदारांनी केला. धुक्यामुळे पिकांवर दव पडत आहे. थंडीच्या कडाक्याने व दिवसा कमाल तपमानात घट झाल्याने म्हसळाकर खूपच गारठले आहेत. त्यामुळे बाजारात स्वेटर, ब्लँकेट, मफलर, कानटोप्या यासारख्या उबदार कपड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असल्याचे स्थानिक व्यापारी सुरेश जैन यांनी सांगितले. Þ सकाळी व सायंकाळी हवामानात शीत लहरींचे प्रमाण हलकेसे वाढले आहे. त्यामुळे बाजारात स्वेटर, ब्लँकेट, मफलर, कानटोप्या यासारख्या उबदार कपड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असल्याचे स्थानिक व्यापारी यांनी सांगितले.हवामान खात्याच्या थंडीच्या अंदाजाने या वेळी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मागणी व थंडी वाढली तरी बाजारातील दर स्थिर राहतील.- रणजीत जैन, रमेश क्लॉथ सेंटरचे मालक

 

टॅग्स :RaigadरायगडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन