मुरु डमध्ये दासभक्तांनी केली स्वच्छता
By Admin | Updated: January 16, 2016 00:24 IST2016-01-16T00:24:56+5:302016-01-16T00:24:56+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून व ज्येष्ठ निरुपणकार तीर्थरुप आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड शहरातील तहसीलदार

मुरु डमध्ये दासभक्तांनी केली स्वच्छता
आगरदांडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून व ज्येष्ठ निरुपणकार तीर्थरुप आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड शहरातील तहसीलदार निवासस्थान व प्रांगणात शुक्रवारी सकाळपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब यांनी हातात झाडू घेऊन अशी कृतिशीलता दाखवली. ग्रामपातळीपासून ते शहरी भागापर्यंत संपूर्ण भारतात ही स्वच्छता मोहीम यशस्वी होताना दिसत आहे. शुक्रवारी सकाळपासून तहसीलदार निवासस्थान व प्रांगणात दासभक्तांनी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. या स्वच्छता मोहिमेत मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील, उदय दांडेकर व १०० दासभक्त सहभागी झाले होते. २४ जानेवारीपासून ग्रामस्वच्छता राबविण्यात येणार आहे, असे मुरुडचे दासभक्त उदय दांडेकर यांनी सांगितले.