मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:59 IST2019-09-17T23:59:11+5:302019-09-17T23:59:14+5:30
मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व गाडीचालकाचे गेले दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने सर्वच सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद
आगरदांडा : मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व गाडीचालकाचे गेले दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने सर्वच सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी, मुरुड शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनू शकतो.
मुरुड नगरपरिषद हद्दीतील स्वच्छतेचा ठेका गंगोत्री इको. टेक्नो. सव्ही. प्रा. लि. यांना दिला आहे. त्यांच्याकडे ३६ कामगार स्वच्छता करत असतात. गणेशोत्सवाच्या आधी वेतन मिळावे, याकरिता ठेकेदार व सुपरवायझरकडे गेले दोन महिने कर्मचाºयांनी वेतनाची वारंवार मागणी करूनही आजपर्यंत कर्मचाºयांना वेतन दिलेले नाही. त्यामुळे बंद आंदोलन करण्यात आले. स्वच्छतेबाबत दक्ष असणाºया मुरुड-जंजिरा नगरपरिषदेला शासनाकडून स्वच्छता अभियानांतर्गत विशेष पुरस्कार प्राप्त झाला. मात्र, ठेकेदार व सुपरवायझर यांच्या हलगर्जीमुळे सफाई कामगारांना काम बंद करणे भाग पडले आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदारावर व सुपरवायझर यांच्यावर कारवाईची मागणी सफाई कामगारांकडून होत आहे. सफाई कामगारांशी मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्ष आरोग्य समिती सभापती नौसिन दरोगे, मुख्याधिकारी अमित पंडित यांनी चर्चा करून दोन दिवसांत संपूर्ण वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिले. या संदर्भात संतोष तवसाळकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
>संपाचे कारण
वेतन त्वरित मिळावे, याकरिता कर्मचारी मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी अमित पंडित यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्याचा प्रयत्न करत असताना सुपरवायझर संतोष तवसाळकर यांनी निवेदन द्यायचे नाही व कोणालाही या संदर्भात भेटायचे नाही, असे सफाई कामगारांना सांगितले, त्यामुळे निवेदन न देता अचानक संपाचा पवित्रा घेण्यात आला.