शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोला प्रकल्पग्रस्त गावांचा पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 05:01 IST

ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे.

- वैभव गायकरपनवेल : ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे. खारकोपर ते नेरुळ या नव्या रेल्वेमार्गावरील गव्हाण गावाचे नाव बदलून सिडकोने ‘गाव्हन’ असा उल्लेख केला आहे. शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने गावांची नावे चुकविल्यास गावांची ओळख मिटू शकते. विशेष म्हणजे, चुकीचा पायंडादेखील यामुळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल तालुक्याचे नाव आता जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे. मोठे मोठे गृहप्रकल्प, मेट्रो, तसेच विविध प्रकल्पांमुळे इथल्या शहरांना नवी ओळख निर्माण होत असली तरी स्थानिकांची अस्मिता त्यांच्या गावांमुळे आजही टिकून आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना अनेकांनी ओळख टिकवून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. नवी मुंबई वसविणाऱ्या सिडकोने मात्र गावाच्या चुकीच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोच्या मुख्य अभियंत्यांनी बुधवारी जाहिरात करून प्रस्ताव मागविणारी सूचना प्रसिद्ध केली आहे. तळोजी येथील पॅकेज, खारघर, कळंबोली व पनवेल टर्मिनस, नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, बामनडोंगरी, खारकोपर फोअरकोर्ट भागातील पॅकेज आदी ठिकाणचे प्रस्तावित गृहप्रकल्प, या गृहप्रकल्पातील प्रस्तावित व्यावसायिक भाग आणि गव्हाण रेल्वेस्थानकातील कॉम्प्लेक्स याकरिता इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, प्लम्बिंग व फायर प्रोटेक्शन आदी सेवा पुरविण्यासाठी संमंत्रकाची म्हणजेच सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या जाहिरातीत गव्हाण गावाचा उल्लेख गाव्हन असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ४० वर्षे होऊनही सिडकोकडून अशा नावाच्या चुका होणे गंभीर बाब आहे. गव्हाण येथील हजारो शेतकºयांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत, तशा नोंदी सिडकोकडे असताना ही इतकी गंभीर चूक होतेच कशी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.गव्हाण गाव हे प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महापालिकेचे सध्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत आदीचे गाव आहे. स्थानिकांची ओळख असलेल्या गावाचे नाव सिडकोसारख्या महामंडळाने चुकविणे ही गंभीर बाब असल्याचे मत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई