शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री शिंदेंचा एका वाक्यात पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 19:28 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे

रायगड - शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आपली बाजू मांडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलंय.  

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्ष सदस्यत्वाचे आमचे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे सर्वात आधी १६ जणांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल द्यावा अशी आमची मागणी आहे. कायदे तज्त्रांच्या मते त्या १६ सदस्यांच्या अपात्रेची शक्यताच जास्त आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिंदे गटाकडूनही त्यांच्यावर पलटवार करण्यात येत आहे. अगोदर राहुल शेवाळे आणि दिपक केसरकर यांनी पलटवार केला आहे. आता, स्वत: मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात टीकास्त्र सोडले. 

आम्ही न्यायप्रिय लोक आहोत, सर्वोच न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. लोकशाहीत राज्यघटना, कायदा आणि नियम आहेत. कायदा, नियमांचे पालन करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  आमच्यासाठी अंतिम असेल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना, आमदारांची बडतर्फी आणि धनुष्यबाण यावरील वादावर दिले. तसेच, काही लोक सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शन करायला, सल्ले द्यायला लागले तर, मी त्यावर काय बोलु शकतो, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर एका वाक्यात पलटवार केला. 

शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत

२०१३ नंतर शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आला, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेवर आक्षेप घेतला. उद्धव ठाकरेंनी सांगितलेली शिवसेनेची घटना पूर्णपणे चुकीची असल्याचा पलटवार राहुल शेवाळेंनी केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार ठाकरेंची नेमणूक झाली तर त्याची माहिती द्यावी. शिवसेनेतील इतर पदे कशी भरली याचीही माहिती द्यावी. विभाग, गटप्रमुख ही पदे भरताना कुठे जाहिराती दिली, किती अर्ज आले हेही दाखवावे, असे आव्हान राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंना दिले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना