ई-रिक्षासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: May 13, 2017 01:08 IST2017-05-13T01:08:28+5:302017-05-13T01:08:28+5:30

येथील वाहतुकीची समस्या ही नित्याचीच झाल्याने यावर पर्यावरणीयदृष्ट्या उत्तम पर्याय म्हणजे बॅटरी रिक्षा हाच एकमेव उरलेला

Chief Minister for e-rickshaw | ई-रिक्षासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

ई-रिक्षासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : येथील वाहतुकीची समस्या ही नित्याचीच झाल्याने यावर पर्यावरणीयदृष्ट्या उत्तम पर्याय म्हणजे बॅटरी रिक्षा हाच एकमेव उरलेला असल्याने लवकरात लवकरच ही सेवा सुरू व्हावी यासाठी आता विधानसभा सदस्य पुढे सरसावले आहेत. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी एकूण तीन वेळा बॅटरी रिक्षाचा मुद्दा उपस्थित केला होता. तर नुकताच स्थानिक आमदारांनी सुद्धा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी के लीआहे. त्यामुळे येथील श्रमिक हातरिक्षा चालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कर्जत - खालापूर मतदार संघाचे क्रि याशील आमदार सुरेश लाड यांनी माथेरान हे पर्यटनस्थळ आपल्याच मतदार संघात येत असल्याने येथील श्रमिकांच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. यासाठी श्रमिकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळून आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होण्यासाठी आ.लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच निवेदन देऊन यातून मार्ग काढावा अशी विनंती के ली आहे.

Web Title: Chief Minister for e-rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.