छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी
By Admin | Updated: April 11, 2017 01:59 IST2017-04-11T01:59:25+5:302017-04-11T01:59:25+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३३७ वी पुण्यतिथी मंगळवारी किल्ले रायगडावर साजरी केली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी
महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३३७ वी पुण्यतिथी मंगळवारी किल्ले रायगडावर साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आदी उपस्थित राहणार आहेत.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यातर्फे रायगडावर ११ एप्रिल व १२ एप्रिलला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १२ एप्रिल रोजी पहाटे ५ वा. गडावरील जगदीश्वर मंदिरात पूजा, स. ८ वा. शिवसमाधी पूजन, स. ९ वा. गडावरील राजदरबार सभागृहात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अभिवादन सभा होणार आहे. दरबार सभागृह ते शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची मिरवणूक होणार आहे.