मालवाहू जहाजातील आॅइल चोरी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 05:15 IST2018-09-12T05:15:06+5:302018-09-12T05:15:08+5:30
दादर सागरी, मांडवा, रेवस, धरमतर आदी भागांत उभ्या मालवाहू जहाजांतील आॅइल, डिझेलची चोरी करणारी १० जणांची टोळी रायगड गुन्हे अन्वेषणने गजाआड केली.

मालवाहू जहाजातील आॅइल चोरी करणारी टोळी गजाआड
अलिबाग : दादर सागरी, मांडवा, रेवस, धरमतर आदी भागांत उभ्या मालवाहू जहाजांतील आॅइल, डिझेलची चोरी करणारी १० जणांची टोळी रायगड गुन्हे अन्वेषणने गजाआड केली. चंद्रकांत पाटील (रा. दादर, ता. पेण), गुड्डू चिंकू भारती (रा. ठाणे), अन्वर मलिक, इकरार महमद अलीखान, बजरंगी यादव, सुलेमान मौजीद मंडल, अन्वर कलाम सरदार, अन्वर हबीबुल्ला मलिक, समीर ठाकूर आणि कैलास म्हात्रे (दोन्ही रा. दादर, ता. पेण) यांच्याकडून ४४ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे आॅइल व डिझेल जप्त केले. अलिबाग व पेण तालुक्याच्या खाडीकिनारी मालवाहू जहाजातील डिझेल व आॅइल चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना मिळाली होती.