घरफोडी प्रकरणाचा लागला छडा
By Admin | Updated: May 28, 2016 02:35 IST2016-05-28T02:35:08+5:302016-05-28T02:35:08+5:30
खोपोली शहरात १५ दिवसांपूर्वी घरात सात तोळे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात नोंद होताच पोलिसांनी तपासाची

घरफोडी प्रकरणाचा लागला छडा
खालापूर : खोपोली शहरात १५ दिवसांपूर्वी घरात सात तोळे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात नोंद होताच पोलिसांनी तपासाची
चक्रे फिरवत असताना या चोरी झालेल्या घरातील अल्पवयीन मुलगीच गायब असल्याचे समोर आले. या चोरीच्या घटनेच्या माध्यमातून मुलीपर्यंत पोचण्याचा मार्ग मिळाल्याने या घटनेच्या तपासाअंती या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच सोने विकत घेणाऱ्या खोपोलीतील एका सोनाराच्या भावाला अटक केली असून, चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
५ ते ६ मे रोजी प्रतिभा कॉम्प्लेस या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलाची परीक्षा असल्याने ते कुटुंब मुलासोबत बाहेर गावी गेले असताना त्याच्या घरातील सात तोळे दागिने चोरीला गेल्याची खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास सुरू असताना त्याच घरातील अल्पवयीन मुलगी रविवारी गायब असल्याची तक्र ार नोंदविण्यासाठी तिचे आईवडील पोलीस ठाण्यात मुलीला कोणी तरी फूस लावू पळवून नेल्याची तक्र ार दिली असल्याने या घटनेत काही तरी वेगळेच असल्याचे समोर आले. या घटनेचा पोलीस निरीक्षक एस. एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह निरीक्षक आश्विनी बावचे, पो. हे. कॉ. तुकाराम महाडीक, ए. एस. आय राठोड, पो. ह. खराडे व भडाले यांनी तपासाची केला मुलगीच या घटनेत सामील असल्याचे समोर आले. या मुलीने आपला प्रियकर प्रतीक बहाडकर (रा. यशवंतनगर) याला मोटारसायकल घेण्यासाठी ते सोने दिले. ते सोने सोनाराला विकण्यासाठी व मदतीसाठी आकाश सुरेंद्र प्रसाद सिंग (रा. खोपोली कॅटरिंग) व हृषीकेश मिहिलेश मिश्रा (रा. विहारी, खोपोली) हेही या गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता हे दागिने खोपोलीतील एका सोनाराला विकल्याचे चौकशीत समजले. खोपोलीतील एका सोनाराचा भाऊ कुशाल जैन याला ताब्यात घेऊन चौकशीत दोषी आढळल्याने अटक केले आहे.
तक्रार दाखल
५ ते ६ मे रोजी प्रतिभा कॉम्प्लेस या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलाची परीक्षा असल्याने ते कुटुंब मुलासोबत बाहेरगावी गेले असताना त्याच्या घरातील सात तोळे दागिने चोरीला गेल्याची खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी मुली गायब झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दिली होती.