पोलिओ मोहीम यशस्वी करण्याचे आव्हान
By Admin | Updated: January 16, 2016 00:27 IST2016-01-16T00:27:31+5:302016-01-16T00:27:31+5:30
मुरुड तालुक्यामध्ये १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रायव्हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येणार

पोलिओ मोहीम यशस्वी करण्याचे आव्हान
नांदगाव : मुरुड तालुक्यामध्ये १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रायव्हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येणार असून, हा ट्रायव्हॅलंट लसीचा शेवटचा राउंड होणार आहे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील, गावातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना रविवारी १९ जानेवारी २०१६ ला सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळच्या पोलिओ बुथवर जाऊन बाळाला लस पाजण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांनी केले आहे.
मुरुड तालुक्यामध्ये पल्स पोलिओ काळात प्राथमिक आरोेग्य केंद्र बोर्ली मांडला कार्यक्षेत्रात ५६ बुथवर २,७९१ बालके व प्राथमिक आरोग्य केंद्र आगरदांडा अंतर्गत २८ बुथवर १,६७८ बालके, नगरपालिका कार्यक्षेत्रात ६ बुथ ९६० बालकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. तसेच साळाव चेकनाका, काशिद बीच, राजपुरी जंजिरा किल्ला, मुरुड बीच व आगरदांडा जेटी या ५ ठिकाणी पर्यटकांच्या बालकांसाठी ट्रॅन्झीट बुथ ठेवण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात एकूण ९५ बुथवर काम करण्यासाठी २१२ कर्मचारी व १८ पर्यवेक्षक नेमून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी सहभाग घेऊन मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.