धाक दाखवून चेन चोरणारा गजाआड

By Admin | Updated: June 30, 2017 02:58 IST2017-06-30T02:58:26+5:302017-06-30T02:58:26+5:30

मित्राच्या मित्रालाच चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या तरु णाला महाड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

Chain thief | धाक दाखवून चेन चोरणारा गजाआड

धाक दाखवून चेन चोरणारा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : मित्राच्या मित्रालाच चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या तरु णाला महाड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
महाड शहरातील नवेनगर परिसरात राहणारा मेहुल आव्हाडे (१८) आणि त्याचा मित्र नितेश जगताप हे दोघे नितेशचा मित्र असलेल्या राजू राणे याच्या दुचाकीने बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लाडवली या गावाकडे गेले होते. लाडवली गावाजवळ दुचाकी थांबूवन हे तिघे पायी जात असताना, राजू राणे याने मेहुलला चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पोबारा के ला. या प्रकरणी मेहुल आव्हाडे याने महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर, पोलिसानी नितेश जगताप याच्याकडून त्याचा मित्र असलेल्या राजू राणे याची माहिती घेऊन त्याला शोधून काढत ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरी हे करीत आहेत.

Web Title: Chain thief