शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

नुकसान भरपाईसाठी ओएनजीसीविरोधात साखळी उपोषणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 1:58 PM

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तेलगळती झाली.

- मधुकर ठाकूर

उरण : तेलगळती संदर्भात स्थानिक शेतकरी, मच्छीमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (१४) बोलाविण्यात आलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली.यामुळे ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच जमलेल्या आणि संतप्त झालेल्या  नुकसानग्रस्तांनी पीरवाडी मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध आंदोलन सुरू करून साखळी उपोषण सुरू केले आहे.  उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तेलगळती झाली. तेलगळतीमुळे शेतकरी, मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या शेतकरी, मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी तहसिलदारांनी पंचनामेही केले आहेत.नुकसान भरपाई देण्याबाबत ओएनजीसी प्रशासनाबरोबर गुरुवारी (१४)  एकत्रितपणे चर्चा करण्याचाही निर्णय तहसीलदारांनी जाहीर केला होता. 

मात्र नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अचानक गुरुवारी घेण्यात येणारी बैठक रद्द करण्यात आली असल्याचा निरोप तहसीलदारांनी पाठविला. त्यामुळे शेतकरी व मच्छीमारांची फसवणूक होत असल्याची भावना नुकसानग्रस्तांमध्ये पसरली आहे. त्यामुळेच गुरुवारी ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच जमलेल्या आणि संतप्त झालेल्या नुकसानग्रस्तांनी पीरवाडी मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध करीत साखळी उपोषण सुरू केले असल्याची माहिती समितीचे नेते काका पाटील यांनी दिली.

या साखळी उपोषणात उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. सागर कडू, वैभव कडू, जनाधर थळी, संतोष कडू, स्वप्निल घरत, आशिष काठे, भुपेश कडू आणि महिलांही सहभागी झालेल्या आहेत. दरम्यान अचानक उच्च न्यायालयात काम निघाल्याने गुरुवारी बोलाविण्यात आलेली बैठक तात्पुरती रद्द करुन स्थगित करण्यात आली आहे.ही बैठक पुन्हा कधीही घेतली जाईल असे स्पष्टीकरण उरण तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी दिले आहे. 

टॅग्स :RaigadरायगडONGCओएनजीसी