नेरळमध्ये दाखले वाटप उपक्रम
By Admin | Updated: June 14, 2016 01:20 IST2016-06-14T01:20:44+5:302016-06-14T01:20:44+5:30
कर्जत महसूल विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी क्षेत्रात शैक्षणिक दाखले त्या ठिकाणी देण्याचा उपक्र म हाती घेतला आहे.

नेरळमध्ये दाखले वाटप उपक्रम
नेरळ : कर्जत महसूल विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी क्षेत्रात शैक्षणिक दाखले त्या ठिकाणी देण्याचा उपक्र म हाती घेतला आहे. नेरळ मंडळमध्ये आयोजित केलेल्या दाखले वाटप उपक्र माला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. तेथे विविध प्रकारचे ४९० दाखले वाटप करण्यात आले. नेरळ येथील शेतकरी भवन येथे आयोजित केलेल्या शासकीय आणि शैक्षणिक कामासाठी दाखले वाटप कार्यक्र माची सुरु वात कर्जतचे उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड आणि कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्या हस्ते झाले. नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या दाखले वाटप उपक्र माला कर्जत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिनकर मोडक, आर. बी. देशमुख यांच्यासह तहसील कार्यालयातील लेखनिक प्रतिभा राठोड, खारकर, जाधव, गुरळे यांना नेरळचे मंडळ अधिकारी एच. एम. सरगर यांच्यासह तलाठी मोरे, शिंदे आदी उपस्थित होते. या शिबिरात उत्पनाचे ३६० दाखले, अधिवास आणि वयाचे ८४ दाखले, क्रिमीलेअरचे ४६ असे ४८० दाखले दिवसभरात वाटप केले. त्यात सहा विद्यार्थ्यांनी जातीचे दाखले मिळावे, यासाठी अर्ज केले असून त्यांना आठ दिवसांच्या आत दिले जातील, अशी माहिती नेरळचे मंडळ अधिकारी सरगर यांनी दिली. (वार्ताहर) शिबिरात उत्पन्नाच्या ३६० दाखल्यांचे वाटप सुरु वातीला तहसील कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखला, वयाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, जातीचे दाखले यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. दुपारी कर्जतचे तहसीलदार बाविस्कर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. या शिबिरात उत्पनाचे ३६० दाखले, अधिवास आणि वयाचे ८४ दाखले, क्रिमीलेअरचे ४६ असे ४९० दाखले दिवसभरात वाटप करण्यात आले. यावेळी पालकांनी समाधान व्यक्त के ले.