वणव्यामुळे गुरांचा चारा होतोय नष्ट

By Admin | Updated: May 1, 2016 02:35 IST2016-05-01T02:35:16+5:302016-05-01T02:35:16+5:30

महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा

Cattle fodder due to wildfire is destroyed | वणव्यामुळे गुरांचा चारा होतोय नष्ट

वणव्यामुळे गुरांचा चारा होतोय नष्ट

दासगाव : महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा आणि पाण्याकरिता भटकंती करत महामार्गावर येत असल्याने वेगाने धावत असलेल्या वाहनांमुळे जनावरांच्या जखमी होण्याच्या प्रमाणात वाढत झाली आहे.
महाड तालुक्यातील काही गावांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ग्रामिण आणि दुर्गम भागातील गावांतून पिण्याकरिता पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरीत पाण्याचे नियोजन करण्यात ग्रामस्थ गुंतले असले तरी गावातील जनावरांचे मात्र हाल झाले आहेत. ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे देखील गुरांचा चारा नष्ट झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि चाऱ्याचा तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील जनावरे भटकंती करत आहेत. चारा आणि पाण्याच्या शोधात असलेली जनावरे थेट महामार्गावर येत असल्याने अपघातात देखील वाढ झाली आहे. महामार्गावर जनावरांच्या जखमी होण्याच्या प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेली महिनाभरात जवळपास ६० जनावरे जखमी झाली आहेत. शुक्रवारी अशाच प्रकारे एका बैलाचा अज्ञात वाहनाचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.
महाड तालुक्यातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्या खाडीलगत असल्याने यातील पाणी बारमाही वाहून देखील खारट असल्याने या पाण्याचा वापर गुरांना होत नाही. ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा नियोजनपध्दतीने वितरीत केले जाते. हा पाणीपुरवठा केवळ ग्रामस्थच वापरत असल्याने गुरांना मात्र पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे ही भटकंती या गुरांच्या जिवावर उठत असल्याने महामार्गावर गेली काही दिवसात गुरांचा अपघात होवून दगावण्याच्या घटना घडत आहेत.

Web Title: Cattle fodder due to wildfire is destroyed