विनयभंग, मारहाण प्रकरणी सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 26, 2015 00:27 IST2015-09-26T00:27:07+5:302015-09-26T00:27:07+5:30
मनोरमानगर येथील १५ वर्षीय मुलगी बुधवारी सात दिवसांचे गणपती बाप्पांचे विसर्जन करून घरी परताना अक्षय खवरे यांनी तिचा विनयभंग केला.

विनयभंग, मारहाण प्रकरणी सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल
ठाणे : मनोरमानगर येथील १५ वर्षीय मुलगी बुधवारी सात दिवसांचे गणपती बाप्पांचे विसर्जन करून घरी परताना अक्षय खवरे यांनी तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या नातेवाईकांना साथीदारांसह बियरच्या बाटलीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहा-सात जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोरमानगर येथे राहणाऱ्या अक्षयने त्याच परिसरातील अल्पवयीन मुलगीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत त्याला समज दिली असता त्याचा राग मनात धरून त्याने पाच-सहा साथीदारांसह येऊन मुलीचा नातेवाईक आकाश त्याच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. तसेच मावस भाऊ काळू याला शिवीगाळ करून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री बायर कंपनीच्या समोर घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.एस.चवरे करीत आहेत. (प्रतिनिधी)