मुंबई-गोवा मार्गावर कारची पिकअपला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:03 IST2018-07-01T03:03:41+5:302018-07-01T03:03:47+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवार सकाळी ८.३०च्या सुमारास मुबई दिशेने जाणाऱ्या एका कारची पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

 The car hits the Mumbai-Goa route | मुंबई-गोवा मार्गावर कारची पिकअपला धडक

मुंबई-गोवा मार्गावर कारची पिकअपला धडक

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवार सकाळी ८.३०च्या सुमारास मुबई दिशेने जाणाऱ्या एका कारची पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलादपूर पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत कोकजे (रा. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील पिकअप व्हॅन घेऊन मुबई ते रत्नागिरी, असा कशेडी घाटातून जात होता. त्याच दरम्यान खेडकडून मुंबईकडे जाणारी कार ही अनंत जंगम व विजय जंगम (रा. भरणे, खेड) यांची कार एका अवघड वळणावर रॉग साइडला जाऊन पिकअप व्हॅनवर समोरासमोर धडकली. या अपघातात कारमधील अनंत जंगम व विजय जंगम हे दोघे जखमी झाले. दोघांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस व कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title:  The car hits the Mumbai-Goa route

टॅग्स :Raigadरायगड