कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधी !

By Admin | Updated: November 7, 2016 02:53 IST2016-11-07T02:53:36+5:302016-11-07T02:53:36+5:30

येथील ‘क’ वर्ग नगरपरिषदेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून अद्याप साध्या प्रचाराला सुरु वात झालेली दिसत आहे

Candidate opportunity for the workers! | कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधी !

कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधी !

माथेरान : येथील ‘क’ वर्ग नगरपरिषदेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून अद्याप साध्या प्रचाराला सुरु वात झालेली दिसत आहे. यावेळी अनेकांनी पक्षबदल केल्यामुळे पक्षप्रमुखांनी नवोदित तसेच पक्ष प्रवेशधारकांना आणि जे अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत, तसेच ऐन निवडणुकीच्या वेळीच पक्ष प्रमुखांना वेठीस धरतात अशाही महाभागांना उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घेऊनच आपापल्या प्रभागात जर लढवय्ये उमेदवार नसले तरीसुद्धा पक्षात आल्याने त्यांना नाराज न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच सर्वच पक्षप्रमुखांनी उमेदवारी बहाल केली आहे.
आगामी निवडणूक ही जरी खर्चीक असली तरीसुद्धा अनेक जण हे केवळ उमेदवारी मिळविण्यात यशस्वीही झालेले दिसत आहेत. काही जणांकडे खिशात छदाम नसताना सुद्धा गावाच्या विकासाची इच्छा असल्याने अनेकजण निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. कुणा एका प्रमुख पक्षाच्या उमेदवाराची दहा ते पंधरा मते आपल्याच पारड्यात पाडून जो खऱ्या अर्थाने गावाचा विकास करण्यास कटिबद्ध आहे, अशांना उमेदवारांमुळे वेळप्रसंगी पराभवाची धूळ चाखावी लागणार आहे. ‘एक गाव बारा भानगडी’ अशीच अवस्था या लहानशा गावात पहावयास मिळत आहे. एकूण आठ प्रभाग असलेल्या माथेरानमध्ये संपूर्ण मतदार संख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. प्रत्येक प्रभागात पाचशेच्या आत मतदार संख्या आहे. परंतु नगर परिषदेच्या सभागृहात आपणच विराजमान व्हायला हवे अशी दिवसाढवळ्या स्वप्ने पाहणारी उमेदवार मंडळी नाहक सक्रि य उमेदवारास अडचण ठरणार आहेत. काही जण उमेदवारी माघारीची तारीख ११ नोव्हेंबर असल्याने तेव्हा कदाचित चिरीमिरी रकमेसाठी माघार घेतील असे चित्र सुद्धा स्पष्ट दिसत आहे. १२ नोव्हेंबरनंतरच प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.
या निवडणुकीत बहुतांश नवोदित उमेदवारांचा भरणा अधिक असल्याने ‘दामच करेल काम’ अशीच परिस्थिती १२ नोव्हेंबरनंतर दिसणार आहे. कारण येथील ठरावीक सुज्ञ मतदार वगळता अन्य मतदारांना गावाच्या विकासाबाबतीत काहीच स्वारस्य नाही. (वार्ताहर)

Web Title: Candidate opportunity for the workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.