महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर, महिला बचत गटाच्या व इतर महिला यांची मोफत कॅन्सर तपासणी शिबीर
By निखिल म्हात्रे | Updated: February 16, 2024 13:00 IST2024-02-16T13:00:31+5:302024-02-16T13:00:49+5:30
- दी लाईफ फाऊंडेशन आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे चेंढरे ग्रामपंचायत हॉल अलिबाग येथे आयोजन करण्यात आले.

महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर, महिला बचत गटाच्या व इतर महिला यांची मोफत कॅन्सर तपासणी शिबीर
अलिबाग - दी लाईफ फाऊंडेशन आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे चेंढरे ग्रामपंचायत हॉल अलिबाग येथे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना घडवण्यात महत्वाची भूमिका घेणार्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व महिला बचत गटाच्या व इतर महिला यांची मोफत कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित केले होते.
शिबीरात नाक, कान, घसा तपासणी व जनरल फिजिशिअन तपासणी तसेच, स्त्रीरोग तज्ञांकडून महिलांची तपासणी करण्यात आली. महिलांना आरोग्य तपासणी बरोबरच समुपदेशनही करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबीरात अलिबाग तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.