शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

वाढलेल्या मतदार संख्येच्या फायद्याची गणिते, सुनील तटकरे यांनी राबविलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा फायदा होणार का? 

By राजेश भोस्तेकर | Updated: May 22, 2024 16:02 IST

तटकरे यांच्यासोबत भाजप आणि शिंदे सेना, मनसे आणि मित्र पक्ष यांचे पाठबळ होते. तर गीते यांच्यामागे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्ष आहेत.

अलिबाग :  रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. गतवेळीपेक्षा १ टक्क्याने मतदानाचा टक्का घसरला असला तरी वाढलेल्या मतदार संख्येमुळे त्याचा फायदा कोणाला होणार हे ४ जून रोजी मतमोजणीनंतर कळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अनंत गीते की सुनील तटकरे हीच चर्चा सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उद्धव सेनेचे  अनंत गीते यांच्यात खरी लढत झाली. वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांच्यासह दहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते; मात्र निवडणुकीत गीते आणि तटकरे यांचाच बोलबाला प्रचारात दिसत होता. तटकरे यांच्यासोबत भाजप आणि शिंदे सेना, मनसे आणि मित्र पक्ष यांचे पाठबळ होते. तर गीते यांच्यामागे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गट आणि मित्र पक्ष आहेत. प्रचारात दोन्ही उमेदवारांनी विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून परस्पर विरोधी प्रचार करण्यात धन्यता मानली. दोन्ही पक्षात असलेली नाराजीनाट्य याचा परिणामही काहीसा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.गीते यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, हुसेन दलवाई, नसीम खान यासह इतर मान्यवरांनी सभा घेतल्या. शेवटच्या टप्प्यात तर इंडिया आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र होते. सुनील तटकरे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, नाजिम मुल्ला, रुपाली चाकणकर,  रामदास आठवले  यांनी प्रचाराला हजेरी लावली. त्यामुळे रंगत वाढली.  रायगड लोकसभा मतदारसंघात ६०.५१ टक्के मतदान झाले आहे. १६ लाख ६८ हजार ३७२ मतदारांपैकी १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ६ लाख ५८ हजार ७६४ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६१.७७ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत १.२६ टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला आहे. असे असले तरी मतदारांची संख्या वाढलेली आहे, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे टक्का कमी झाला तरी वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जाणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

विधानसभानिहाय मतदानमतदार संघ     २०१९      २०२४पेण    १,९५,५६७    १,९५,६५३अलिबाग     १,८९,७५८    १,९८,२८५श्रीवर्धन     १,५२,६६४    १,५५,२५४महाड     १,६८,५८०     १,६३,६९६दापोली    १,७१,९०७    १,६०,७९८गुहागर    १,४१,७०९    १,३५,८७७एकूण    १०,२०,१८५    १०,०९,५६३ 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेalibaugअलिबागlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४