Bullet train arrives at a school in Adivasi Wadi at Varne Thakurwadi | वर्णे ठाकूरवाडी येथील आदिवासी वाडीतील शाळेत आली बुलेट ट्रेन   

वर्णे ठाकूरवाडी येथील आदिवासी वाडीतील शाळेत आली बुलेट ट्रेन   

कर्जत : तालुक्यातील वर्णे ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या रंगहीन भिंतीवर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन काढली आहे.
वर्णे ठाकूरवाडी येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, तेथे आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या प्रेरणेतून व केंद्र प्रमुख नलिनी साळोखे यांच्या सहकार्याने वर्णे ठाकूरवाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी लॉकडाऊनच्या काळात शाळेचा कायापालट केला आहे. शाळेत चित्रकला शिक्षक नसतानाही मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाडीले व शिक्षक मित्र श्रीकृष्ण सुपे, श्रीकृष्ण लोहारे, विजय चौरे, खंडू कावळे यांनी शाळेच्या भिंतीवर वारली चित्रे काढली आहेत, तसेच भारतात बुलेट ट्रेन येण्याअगोदरच या शिक्षकांनी आपल्या शाळेत बुलेट ट्रेन रेखाटली आहे. त्यामुळे शाळेचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Web Title: Bullet train arrives at a school in Adivasi Wadi at Varne Thakurwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.