बीएसएनएलची सेवा ३० तास ठप्प!

By Admin | Updated: April 27, 2017 00:03 IST2017-04-27T00:03:24+5:302017-04-27T00:03:24+5:30

डिजिटल इंडियाच्या रेट्यामध्ये बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेसह लँडलाइन फोन सेवाच तब्बल ३० तास ठप्प पडली होती.

BSNL service jam for 30 hours! | बीएसएनएलची सेवा ३० तास ठप्प!

बीएसएनएलची सेवा ३० तास ठप्प!

अलिबाग : डिजिटल इंडियाच्या रेट्यामध्ये बीएसएनएलच्या ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेसह लँडलाइन फोन सेवाच तब्बल ३० तास ठप्प पडली होती. बीएसएनएलच्या खंडित सेवेचा फटका अलिबाग बीएसएनएल केंद्रांतर्गत येणाऱ्या एक हजार १७५ इंटरनेट ग्राहक आणि तीन हजार लँडलाइन ग्राहकांना बसला. काहीच दिवसांपूर्वी ग्राहकांना बंद सेवेचा फटका बसला होता.
संपूर्ण टेलिफोन केंद्र बंद पडले असताना येथे त्याची दुरु स्ती करु न ते पूर्ववत सुरु करण्याकरिता स्थानिक अभियंते अपयशी ठरल्याने आता पनवेल येथून अभियंते येणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मंगळवारपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा तसेच लॅन्डलाइन सेवा बंद पडल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद , जिल्हा रु ग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह यांचा जिल्ह्यातील उर्वरित १४ तालुक्यांशी संपर्कतुटला होता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आॅनलाइन सेवाच बंद पडल्याने जनसामान्यांची चांगलीच दमछाक झाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांना कामे न झाल्याने रिकाम्या हातीच परतावे लागले. इंटरनेट सेवाच ठप्प असल्याने करणार काय असे उत्तर सरकारी कार्यालयातून मिळताच. कामानिमित्त आलेल्यांनी बीएसएनएलच्या नावाने खडे फोडले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान बीएसएनएलच्या केबलला ड्रॅप लागल्याने अलिबाग सर्कलमधील बीएसएनएल यंत्रणा ठप्प झाली. त्यामध्ये बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा, एसटीडी सेवा आणि मोबाइल सेवेचाही समावेश आहे. अलिबाग सर्कलमधील मुरु ड आणि म्हसळ्याच्या बीएसएनएल सेवाही यामुळे पुन्हा बाधित झाली. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच बँकांचे व्यवहार अडचणीत आले होते.
नेटवर्कनसल्यामुळे कोअर बँकिंग, एटीएम सेवाही विस्कळीत झाली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इंटरनेट आणि फोन सेवा पूर्ववत सुरु झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (प्रतिनिधी)

Web Title: BSNL service jam for 30 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.