लाचखोर कृषी अधिकारी सुरेश खेडकर अटकेत
By Admin | Updated: August 27, 2015 23:10 IST2015-08-27T23:10:32+5:302015-08-27T23:10:32+5:30
तालुक्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करताना, ठेकेदाराचे बिल अदा करताना कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी आणि तीन कृषी पर्यवेक्षक यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती.

लाचखोर कृषी अधिकारी सुरेश खेडकर अटकेत
कर्जत : तालुक्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करताना, ठेकेदाराचे बिल अदा करताना कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी आणि तीन कृषी पर्यवेक्षक यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती. याप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साडेतीन लाखांची लाच घेताना तीन कृषी पर्यवेक्षकांना रंगेहाथ पकडले. मात्र कर्जत तालुका कृषी अधिकारी सुरेश खेडकर फरार झाला होता, अखेर एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्याला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पुणे येथून कर्जतमध्ये कृषी विभागात नोकरीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी पाणलोटची कामे करण्यासाठी पुणे येथील शिवा लालू पवार या ठेकेदाराची नेमणूक केली होती. ठेकेदाराने कर्जत तालुक्याच्या कशेळे विभागामध्ये वर्षभरात ५० लाख रु पयांची कामे केली होती. त्यातील २१ लाख रु पयांच्या धनादेशामधील ९ लाख रु पये ठेकेदार शिवा पवार यास परत करण्याची तयारी दर्शवून सर्व रक्कम या कार्यालयातील लोकसेवकांनी कमिशन (लाच) म्हणून मागणी केली होती.यामध्ये कृषी अधिकारी सुरेश खेडकर, सहायक कृषी अधिकारी रावसाहेब आंधळे, कृषी पर्यवेक्षक संदीप जाधव, नंदकुमार पवार यांचा समावेश होता. याबाबत ठेकेदार शिवा पवार (४५, रा. पुणे) यांनी रायगड लाचलुचपत विभागाकडे धाव घेवून तक्र ार केली होती. त्यानंतर २३ जुलैला रायगड लाचलुचपत विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक इनामदार यांनी ठेकेदाराकडून लाच घेताना कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांना पकडले होते. (वार्ताहर)
फरार अधिकारी : या प्रकरणातील तालुका कृषी अधिकारी सुरेश खेडकर हा फरार झाला होता. पुणे येथे राहत असलेला खेडकर हा पोलिसांना चकवा देता होता. अखेर एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांना लाचखोर कर्जत तालुका कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात यश आले. त्याला जिल्हा न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.