शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन इंडियाच्या स्वप्नाला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 01:48 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी जात असल्याने एमआयडीसीला विरोध

अलिबाग : महाड, रोहा, खालापूर, अलिबाग, माणगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र प्रस्थापित झाले आहे. नव्याने रोहा, मुरुड, खालापूर, अलिबाग परिसरात देखील औद्यगिक प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी जात असल्याने त्यांनी या एमआयडीसीला विरोध केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मेक इन इंडियाच्या शासनाच्या स्वप्नाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुरुड, रोहा तालुक्यात नवेनगर औद्योगिक एकात्मिक वसाहत हा सिडकोचा प्रकल्प आधी मंजूर करण्यात आला होता. यासाठी १९ हजार हेक्टर जागा भूसंपादित केली जाणार होती. मात्र त्यानंतर मुरुड आणि रोहा तालुक्यातील १९ गावे प्रकल्पातून वगळून त्याठिकाणी आता औषधनिर्मित प्रकल्प उभारला जाणार आहे . मुरुड तालुक्यातील १४ तर रोहा तालुक्यातील ५ गावातील शेतजमीन भूसंपादित केल्या जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना नोटीसीही पाठवण्यात आल्या आहेत. मुरुड रोहा तालुक्यातील १९ गावातील शेतकरी आणि मच्छीमार यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. १९ गावातील हजारो एकर जमीन प्रकल्पात जात असून गाव ही उद्ध्वस्त होत आहे.मुरुड-रोहा तालुक्यातील या १९ गावात भातशेती, मासेमारी, आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे येथील जमीन ही पिकती आहे. त्यातून शेतकरी आणि मच्छीमारांचा चरितार्थ उत्तमरित्या सुरू आहे. त्यामुळे फार्मा पार्क प्रकल्पाला शेतकरी आणि मच्छीमार याचा विरोध आहे. शेतकरी आणि मच्छीमार यांच्या याविरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षाच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. प्रकल्पाच्या विरोधात १९ गावातील नागरिकांनी आंदोलन ही केले आहे. त्यामुळे मुरुड रोहा तालुक्यातील प्रकल्पाचे भवितव्य शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अधांतरी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहा मुरुड तालुका परिसरात येणाऱ्या प्रकल्पाला एकीकडे विरोध होत असताना खालापूर नारंगी परिसरात येत असलेल्या एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र मागण्या मान्य न झाल्यास विरोध करू असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. नारंगीसह दहा गावातील ३७५ हेक्टर जमीन एमआयडीसी प्रकल्पासाठी जात आहे. यामध्ये फायनल नोटिफिकेशन ही झाले आहे. शेतकऱ्यांना जमीन देण्यास आणि विकासाला विरोध नाही. शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्यास विरोध नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये साडे बावीस टक्के जमीन द्या, शासकीय सेवेत घ्या, जमिनीचा योग्य मोबदला द्या या प्रमुख मागण्या शेतकऱ्याच्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चाही काढून विरोध दर्शवला आहे.हजारो हेक्टर जमिनी पडूनरायगडात आधीच औद्योगिक क्षेत्र हे मोठे आहे. यासाठी शासनाने आणि खासगी कंपन्यांनी जिल्ह्यातील अनेक भागात एमआयडीसी जमिनी भूसंपादित केल्या आहेत. मात्र अद्यापही या हजारो हेक्टर जमिनी पडून आहेत. या जमिनीवर कोणतेही प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे या जमिनीवर प्रकल्प उभारा अशी मागणीही यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.नवीन प्रकल्पापासून धोका नाहीयेत असलेल्या प्रकल्पांना नियमावली देण्यात आलेली असते. त्यांना पाणी प्रदूषण, हवेचे प्रदूषण याबाबत सूचना देण्यात येत असतात. त्यानुसार प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या अत्याधुनिक यंत्रामुळे हल्ली प्रदूषण रोखण्यात यश येत आहे. त्यामुळे प्रदूषणाचे नियम पाळूनच नवीन प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. प्रदूषण मंडळाकडून याबाबत एमआयडीसी परिसरात नेहमी पाहणी करून दोषींवर कारवाई ही करत असते.

टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडिया